Breaking News

MPSC परिक्षेच्या तारखेत पुन्हा बदल २० सप्टेंबर रोजी होणार

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा नियोजित तारखेला घेण्याऐवजी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही परिक्षा जून आणि नंतर १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु आता त्याही तारखेची परिक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता ही परिक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पत्राच्या आधारे राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

मार्च महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. साधारणत: जून महिन्यापासून लॉकडाऊनच्या शिथिलीकरणास सुरुवात झाल्याने ही परिक्षा जून १७ जूनला घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र या कालावधीतही कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढता राहिल्याने अखेर १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र त्या दिवशी राष्ट्रीय सामाईक परिक्षा याच दिवशी होणार असल्याने एमपीएससीच्या परिक्षा घेणे अशक्य बनले. त्यामुळे ही परिक्षा आता २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळविण्यात आले.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *