Breaking News

दोन महिन्यात गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी, ३० आयपीओ येणार कंपन्या ४५ हजार कोटी रूपयांची रक्कम उभारणार

मुंबईः प्रतिनिधी
आगामी दोन महिन्यात आयपीओ (प्राथमिक समभाग विक्री) बाजारात तेजी असेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जवळपास ३० कंपन्या भांडवल उभारणीसाठी आयपीओ आणणार आहेत. यामधून या कंपन्या ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभारू शकतात.
आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित अधिक कंपन्या आहेत. पॉलिसीबाजार (६०१७ कोटी रुपये), एमक्योर फार्मास्युटिकल्स (४५०० कोटी रुपये), नायका (४००० कोटी रुपये), सीएमएस इन्फो सिस्टम्स (२००० कोटी रुपये) आहेत. , मोबिक्विक सिस्टम्स (१९०० कोटी रुपये), नॉर्दर्न आर्क कॅपिटल (१८०० कोटी रुपये), एक्झिगो (१६०० कोटी रुपये), नीलमणी फुड्स (१५०० कोटी रुपये), फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक (१३३० कोटी रुपये), स्टरलाइट पॉवर (१२५० कोटी रुपये), रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज (१२०० कोटी) आदी कंपन्या आयपीओ आणणार आहेत.
झोमॅटोच्या आयपीओने नवीन टेक कंपन्यांना आयपीओसाठी प्रोत्साहित केलं आहे. झोमॅटोचा आयपीओ ३८ पट सबस्क्राइब झाला. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा अधिक सुधारणा होत आहे. त्यामुळे आगामी महिन्यात अनेक मोठ्या कंपन्या आयपीओची तयारी करत आहे.
२०२१ मध्ये ४० कंपन्यांनी ६४,२१७ कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ आणले. आदित्य बिर्ला सन लाईफचा २९ सप्टेंबर रोजी आयपीओ येत आहे. या आयपीओतून कंपनी २७७८ कोटी रुपये उभारेल.
याशिवाय पॉवर ग्रिड, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयपीओद्वारे ७,७३५ कोटी रुपये उभारले. तर ब्रूकफील्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टनेही आयपीओतून ३,८०० कोटी रुपये उभारले.
कोरोना लॉकाडाऊनमुळे २०२० मध्ये अवघे १५ आयपीओ आले होते. यामधून २६.६११ कोटी रुपये उभारण्यात आले. २०१७ हे वर्ष आयपीओंसाठी चांगले राहिले. या वर्षात ३६ कंपन्यांनी आयपीओमधून ६७,१४७ कोटी रुपये भांडवल उभारलं.
कंपन्यांना आपल्या व्यवसायवाढीसाठी आणि चालू खर्चासाठी भांडवलाची गरज लागते. भांडवल उभे करण्यासाठी कंपन्यांकडे कर्ज घेण्याचा मार्ग असतो. मात्र, कर्ज घेण्यापेक्षा कंपनी आपले शेअर्स विक्रीला काढून भांडवलाची तजवीज करते. ही शेअर्स विक्री करणे म्हणजे पब्लिक इश्यू काढणे. पब्लिक इश्यूचे प्रारंभिक आणि त्यानंतरचा असे दोन भाग पडतात. प्रारंभिक पब्लिक इश्यू म्हणजेच आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर ). त्यानंतरच्या इश्यूला एफपीओ ( फॉलोऑन पब्लिक ऑफर) म्हणतात. आयपीओ काढणाऱ्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होते. या सर्व प्रक्रियेनंतर हे शेअर्स गुंतवणूकदार शेअर बाजारात हवे तेव्हा विकू शकतात.

Check Also

१८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने विमाने घेणार उड्डाण बुकींग मर्यादा काढून टाकली

मुंबई: प्रतिनिधी विमान कंपन्या आणि देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने विमान कंपन्यांना १८ ऑक्टोबरपासून सर्व जागांसाठी तिकीट बुक करण्याची परवानगी दिली आहे. कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे फ्लाइटवरील क्षमता मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विमानभाडे कमी होण्याची शक्यता आहे. हवाईवाहतूक मंत्रालयाने विमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *