Breaking News

आरोग्य

राज्याच्या उर्वरित जिल्हे आणि महानगरपालिकांमध्ये लसीकरणाचा ड्राय रन महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या शुक्रवार ८ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये १ आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. …

Read More »

कोरोना: राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या पुन्हा ५० हजारापार ४ हजार ३८२ नवे बाधित, २ हजार ५७० बरे झाले तर ६६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांमुळे आणि कमी नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजाराहून कमी झाली होती. मात्र आज बरे होणाऱ्यांचे प्रमाण बाधित रूग्णांपेक्षा कमी असल्याने अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मागील २४ तासात राज्यात ४,३८२  नवीन रुग्णांचे निदान झाले …

Read More »

कोरोना : दोन दिवसानंतर मृतकांच्या संख्येत आज पुन्हा वाढ ३ हजार १६० नवे बाधित, २ हजार ८२८ बरे झाले तर ६४ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सर्वात कमी ३५, २९ अशी मृतकांच्या संख्येची नोंद झाली होती. त्यामुळे मृतकांची संख्या अशीच कमी नोंदविली जावून महाराष्ट्र कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येपासून मुक्ती मिळणार असल्याची शक्यता वाटत असतानाच पुन्हा आज मृतकांची संख्या ६४ इतकी नोंदविण्यात आल्याने मृतकांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. आज २ …

Read More »

ब्रिटन कोरोना स्ट्रेनचे रूग्ण मुंबईसह महाराष्ट्रातही सापडले नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घ्या- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी ब्रिटनमधून आलेल्या महाराष्ट्रात आलेल्या ८ प्रवाशांना कोरोना स्ट्रेनची धक्कादायक माहिती पुढे आली असून यातील ५ रूग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुणे, मीरा भायंदर आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रूग्ण असल्याचे एकात्मिक साथ रोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितले. या संसर्ग विषाणूचा प्रसार होवू नये यासाठी मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

कोरोना: बाधितांपेक्षा ५ पटीत घरी गेले तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५० हजारा खाली २ हजार ७६२ नवे बाधित, १० हजार ३६२ बरे झाले तर २९ मृतक

मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात नवे आढळून आलेल्या बाधितांपेक्षा पाच पट्टीने अधिक रूग्ण अर्थात १० हजार ३६२ जण बरे होवून गेले. त्यामुळे आजपर्यंत घरी गेलेल्यांची एकूण संख्या १८ लाख ४७ हजार ३६१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४८ हजार ८०१ इतकी कमी नोंदविली गेली आहे. यामुळे राज्यातील …

Read More »

कोरोना: राज्यात पहिल्यांदाच सर्वात कमी मृतकांची नोंद ३ हजार २८२ नवे बाधित, २ हजार ६४ बरे झाले तर ३५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल ६ महिन्यानंतर राज्यात ३५ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून साधारणत: ५० ते १०० या दरम्यान कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद होत होती. मात्र पहिल्यांदाच ५० हून कमी मृतकांची नोंद झाली आहे. ही दिलासा देणारी बाब आहे. आज २,०६४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत …

Read More »

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनलाही मिळाली परवानगी तज्ञ समितीकडून आज मान्यता

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनावरील उपचारासाठी काल सीरम इन्स्टीट्युटच्या कोविशिल्ड या लसीला परवानगी दिल्यानंतर आज भारत बायोटेक-इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टीट्युटच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या को व्हॅक्सीनलाही आज केंद्र सरकारच्या तज्ञ समितीने मान्यता दिली. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत ही लस वापरता येणार आहे. कोरोनावरील औषधांच्या पडताळणीसाठी सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या तज्ञ …

Read More »

कोरोना : मुंबईत बाधित ३ लाखाकडे तर राज्यातील मृतक संख्या ५० हजाराच्या जवळ ३ हजार २१८ नवे बाधित, २ हजार ११० बरे झाले तर ५१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील काही काळात मुंबईत शहरातील सर्वाधिक बाधित आणि मृतकांची संख्या सर्वाधिक आढळून येत होती. मात्र आता बाधित आणि मृतकांची संख्या चांगल्यापैकी नियंत्रणात आली असून गेले काही दिवस ५०० ते ७०० च्या आसपास नवे बाधित आढळून येत आहेत. तर जवळपास १० दिवसांपासून मृतकांची संख्या एकेरी स्वरूपात आढळून येत आहे. …

Read More »

कोरोना: बाधितांची संख्या स्थिर तर घरी जाणारे वाढले ३ हजार ५२४ नवे बाधित, ४ हजार २७९ बरे झाले तर ५९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी काल ३१ डिसेंबर २०२० या वर्ष अखेरच्या दिवशी राज्यात जवळपास समसमान बाधित आणि घरी जाणाऱ्यांची संख्या होती. मात्र आज वर्षाच्या पहिल्या दिवशी ३ हजार ५२४ नवे बाधित आढळून आले आहेत. तर घरी जाणाऱ्यांच्या संख्येत १ हजाराने वाढ ४ हजार २७९ इतके बाधित बरे होवून घरी गेले असल्याने …

Read More »

कोरोना : ७ मार्च ते वर्ष अखेर बाधित १९ लाखावर तर बरे झाले १८ लाखाहून अधिक ३ हजार ५०९ नवे बाधित, ३ हजार ६१२ बरे झाले तर ५८ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात ७ मार्च २०२० रोजी पहिला बाधित रूग्ण पुण्यात आढळून आल्यानंतर ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत तब्बल १९ लाख ३२ हजार ११२ वर एकूण बाधितांची संख्या पोहचली. मात्र यातील दिलासादायक बाब म्हणजे २०२० वर्षाच्या अखेरला या एकूण बाधितांपैकी १८ लाख २८ हजार ५४६ बरे झाले असून ५३ …

Read More »