Breaking News

कोरोना: kdmc मध्ये आजही वाढ तर राज्यातील अॅक्टीव्ह रूग्ण ६० हजारावर १०१ रूग्णांचा मृत्यू तर मुंबई पोहोचली ३० हजारावर

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने आपल्या उपचार पध्दती आणि संख्या मोजण्याच्या पध्दतीत बदल केला. त्यानुसार सुरुवातीला घरी जाणाऱ्यांची संख्या, मृतक आदींची संख्या वगळण्यास सुरुवात केली. त्यामुळे रूग्ण संख्येत घट झाल्याचे दिसायला लागले. मात्र पुन्हा आता अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून ३८७० अधिक २६९=४११३ इतक्या रूग्णांचे निदान आज झाले. तर १०१ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६० हजारावर पोहोचली. तर मुंबईतील रूग्णांची संख्या ३० हजाराच्या घरात पोहोचली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत २५४ रूग्णांचे निदान मागील २४ तासात झाले.
राज्यात आतापर्यंत ६ हजाराहून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला असून मुंबई आणि महानगरात ४५६८ इतक्या रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) – ४९.७८ % एवढे आहे. राज्यातील मृत्यूदर – ४.६७ %. सध्या राज्यात ६,००,०६६ लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,२८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मृत्यू -राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत .उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत.

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ७० मुंबई -४१, ठाणे मनपा-२९
नाशिक नाशिक – ७,अहमदनगर – १
पुणे १४ पुणे – १४
औरंगाबाद औरंगाबाद– १
लातूर लातूर – १
अकोला अकोला – ४, अमरावती- १, बुलढाणा – १, वाशिम – १

 

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ६६४८८ ३३४९१ ३६७१ २९३१८
ठाणे २४३८८ ९५७५ ७१६ १४०९६
पालघर ३४५३ १०४७ ९०   २३१६
रायगड २५३० १५४१ ९१ ८९६
रत्नागिरी ५०१ ३३४ १७   १५०
सिंधुदुर्ग १६३ १२६   ३३
पुणे १५८८१ ८६२२ ६०१   ६६५८
सातारा ८४० ५८४ ३८ २१७
सांगली २९३ १६०   १२६
१० कोल्हापूर ७४१ ६७०   ६३
११ सोलापूर २२०५ १०३० १७२   १००३
१२ नाशिक २७६२ १५२६ १५२   १०८४
१३ अहमदनगर २८० २०९ १२   ५९
१४ जळगाव २२५८ ११८७ १८२   ८८९
१५ नंदूरबार ८३ ३६   ४२
१६ धुळे ५०० ३२९ ४६ १२४
१७ औरंगाबाद ३४०० १८८० १७४   १३४६
१८ जालना ३६५ २३१ ११   १२३
१९ बीड ९३ ६५   २५
२० लातूर २१७ १३९ १२   ६६
२१ परभणी ८५ ७४  
२२ हिंगोली २५२ २१४   ३७
२३ नांदेड २८२ १७५ ११   ९६
२४ उस्मानाबाद १७६ १३०   ४०
२५ अमरावती ४४१ २७८ २२   १४१
२६ अकोला ११८८ ७५७ ६३ ३६७
२७ वाशिम ७१ १७   ५१
२८ बुलढाणा १६० १०४   ५०
२९ यवतमाळ २३३ १६१   ६५
३० नागपूर १३२५ ८३३ १३   ४७९
३१ वर्धा १४ ११  
३२ भंडारा ७५ ४९   २६
३३ गोंदिया १०१ ६९   ३२
३४ चंद्रपूर ५८ ४४   १४
३५ गडचिरोली ५९ ४६   १२
  इतर राज्ये/ देश ११४ २०   ९४
  एकूण १३२०७५ ६५७४४ ६१७० १४ ६०१४७

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *