Breaking News

आता भारत बायोटेकनेही केली लसीच्या किंमतीत कपात २०० रूपयांची कपात केल्याची ट्विटरद्वारे माहिती

मुंबई :प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात मोफत लसीकरणाची घोषणा करताच सीरम इस्टीट्युटने कोविशील्ड लसीच्या किंमतीत प्रती डोस १०० रूपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता भारत बायोटेकनेही आपल्या प्रती डोसच्या किंमतीत थेट २०० रूपयांनी कपात करत ६०० रूपयांची लस आता ४०० रूपयात राज्य सरकारला विकणार असल्याची माहिती भारत बायोटेकने ट्विटरद्वारे दिली.

भारत बायोटेक कंपनी या महिन्यात आणि पुढील महिन्यात प्रत्येकी १० लाख डोस महाराष्ट्राला उपलब्ध करून देणार आहे. तर जूलै महिन्यात २० लाख लस डोस उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मिळणाऱ्या लसी या ४०० रूपये दराने उपलब्ध होणार आहेत. सीरम पाठोपाठ आता भारत बायोटेकनेही आता आपल्या लसीच्या दरात कपात केल्याने राज्यातील लस खरेदीच्या पैसे काही प्रमाणात वाचणार आहेत. तसेच वाचणाऱ्या पैशातून अतिरिक्त लसींचे डोसही खरेदी करता येणे शक्य होणार आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *