Breaking News

गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानी पोहोचले संपत्ती ८१ अब्ज डॉलरवर समूह कंपन्यांचे मार्केट कॅप १० लाख कोटींच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी

अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचले आहे. समूहाच्या एकूण ६ सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ९.९१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. यामुळे समूहाचे मालक गौतम अदानी आता जगातील १४ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत.

गेल्या ३ महिन्यांपासून अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची बातमी १४ जून रोजी आली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की परदेशी गुंतवणूकदारांचा कोणताही मागमूस नाही आणि अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व विदेशी कंपन्या एकाच पत्त्यावर नोंदणीकृत आहेत. यानंतर या समूहाच्या सर्व शेअर्सच्या किमती प्रचंड घसरल्या होत्या.

या घसरणीमुळे ३ जुलै रोजी समूहाचे एकूण मार्केट कॅप ७.०८ लाख कोटी रुपयांवर गेले होते. मात्र,११ जून रोजी या कंपन्यांचे मार्केट कॅप ९.४२ लाख कोटी रुपये होते. आज हा आकडा ९.९१ लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच जुलैच्या तुलनेत २.८२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.  जुलैमध्ये जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या क्रमवारीत गौतम अदानी २४ व्या क्रमांकावर घसरले. मात्र, जुलैपासून या कंपन्यांचे शेअर्स पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली. १४ जून ते ३० जून दरम्यान या कंपन्यांचे शेअर्स ५० टक्क्यांपर्यंत घसरले होते.

अदानी टोटल गॅसच्या शेअर्सचा भाव १७१५ रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर पोहोचला आहे. या कंपनीची मार्केट कॅप १८५,११८ कोटी  रुपये आहे. ३ जुलै रोजी हा आकडा १०१,२२६ कोटी रुपये होता. यामध्ये ८३,८९२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर आज वर्षभराच्या उच्चांकावर आहे. त्याचे मार्केट कॅप १.५६ लाख कोटी रुपयांवरून १.९० लाख कोटी रुपये झाले आहे. यामध्ये ३४ हजार कोटींची वाढ झाली आहे.

अदानी पोर्टचा शेअर्सचा भाव ७५० रुपयांवर आहे. कंपनीची मार्केट कॅप १.५३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. यामध्ये ८ हजार कोटींची वाढ झाली आहे. अदानी पॉवरचा शेअर्स १०९ रुपयांवर आहे. त्याची मार्केट कॅप ४३ हजार कोटी आहे. अदानी ट्रान्समिशनचा शेअर एका वर्षाच्या उच्चांकांवर १९९५ वर व्यवहार करत आहे. त्याचे मार्केट कॅप १.०५ लाख कोटी रुपयांवरून २.१९ लाख कोटी रुपये झाले आहे. यामध्ये १.१३  लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर्स १,२८६ रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याचे मार्केट कॅप १.५७ लाख कोटी रुपयांवरून २ लाख कोटी रुपये झाले आहे. यामध्ये ४३ हजार कोटींची वाढ झाली आहे. समूह कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्याने अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीतही वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, अदानी यांची एकूण संपत्ती ८१.२ अब्ज डाॅलर आहे. जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या क्रमवारीत  अदानी १४ व्या क्रमांकावर आहेत. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी ११ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९८.८ अब्ज डॉलर आहे.

Check Also

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *