Breaking News

दिवाळीत सोने खरेदी करताना जाणून घ्या कर नियम सोने खरेदी करताना करविषयक माहिती लक्षात ठेवा

धनत्रयोदशीला केलेली कोणतीही गुंतवणूक शुभ मानली जाते. अनेक जण या दिवशी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सोन्यात अनेक प्रकार गुंतवणूक करता येते. सोन्यातील या गुंतवणुकीवर कर नियमही वेगवेगळे आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी कर नियम जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

सोन्यावरील कर नियम

भौतिक सोने

भौतिक सोने (Physical Gold) म्हणजे प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी केलेले सोने. भौतिक सोन्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेन कर आकारला जातो. तुम्ही सोने ३६ महिन्यांपेक्षा कमी काळ बाळगून ते विकल्यास त्यावरील मिळणारा नफा तुमच्या उत्पन्नात जोडला जाईल. त्यानुसार तुम्हाला कर भरावा लागेल.

डिजिटल सोने
डिजिटल सोन्यात ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर कोणताही कर आकारला जात नाही. डिजिटल सोन्यातील गुंतवणूक ३६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवल्यास दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू होतो. म्हणजेच नफ्यावर २० टक्के कर सरचार्ज आणि ४ टक्के सेस भरावा लागतो. तुम्ही या कालावधीच्या पुढे सोने कायम ठेवले आणि विकले तर तुम्हाला अधिभारासह २० टक्के कर आणि त्यावर ४ टक्के उपकर भरावा लागेल. प्रत्यक्ष सोने खरेदी करताना तुम्हाला जीएसटी भरावा लागेल.

पेपर गोल्ड
म्युच्युअल फंड आणि गोल्ड ईटीएफवरील कर नियम भौतिक सोन्याप्रमाणेच आहेत. परंतु सार्वभौम सुवर्ण रोख्यांचे नियम वेगळे आहेत. तुम्हाला सुवर्ण रोख्यांवर मिळाले व्याज तुमच्या इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात मोजले जाते. या उत्पन्नावर टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जातो. आठ वर्ष गुंतवल्यानंतर जो काही परतावा मिळतो तो करमुक्त असतो. तुम्ही वेळेपूर्वी बाहेर पडल्यास परताव्यावर वेगवेगळे कर दर लागू होतात.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *