Breaking News

धनत्रयोदशीला बड्या ज्वेलर्सकडून दागिन्यांवर मोठी सूट

यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने, चांदी खरेदी करतात. ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता दरवर्षी ज्वेलर्स धनत्रयोदशीला खास ऑफर देतात. या वर्षीही देशातील अनेक बडे ज्वेलर्स सोने-हिऱ्यांच्या दागिन्यांवर सूट देत आहेत.

तनिष्क
तनिष्क ज्वेलर्सकडून सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर २० टक्के सूट दिली जात आहे. तर जुन्या सोन्याच्या विक्रीवर ग्राहकांना १०० टक्के विनिमय मिळत आहे. एसबीआय बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ४,००० रुपयांची सूट मिळत आहे.

मलबार गोल्ड आणि डायमंड

कंपनी ३०,००० रुपयांच्या खरेदीवर १०० mg सोन्याचे नाणे देत आहे. याशिवाय डायमंड मूल्यावर ३० टक्के सूट दिली जात आहे. तसेच २५,००० रुपयांच्या पेमेंटवर ५ टक्के सूट उपलब्ध आहे. तर कमाल कॅशबॅक २,५०० रुपये असेल. मलबार गोल्ड आणि डायमंडची ही सवत सवलत १९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत आहे.

कल्याण ज्वेलर्स
कल्याण ज्वेलर्सच्या कॅन्डेरे ब्रँडवर २० टक्के सूट उपलब्ध आहे. मोठ्या बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ३ टक्के सूट उपलब्ध आहे.

जॉयलुक्कास
जॉयलुक्कास ब्रँड हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर २५ टक्के सूट देत आहे.

कॅरेट लेन
कंपनी हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर २५ टक्के सूट देत आहे. एसबीआय बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के सूट उपलब्ध आहे. ही ऑफर १२ नोव्हेंबरपर्यंत आहे.

मेलोरा
मेलोराच्या सोन्याच्या दागिन्यांवर २५ टक्के सूट मिळत आहे. डायमंड ज्वेलरीवर ४० टक्के सूट उपलब्ध आहे. आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, येस बँक आणि वनकार्डद्वारे पेमेंटवर ७.५ टक्के सूट देखील आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *