Breaking News

सेन्सेक्स, निफ्टी वधारले आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार वधारला

मराठी ई-बातम्या टीम

देशातील शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९६ अंकांनी वधारून ५७४२० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८२ अंकांनी वाढून १७०८६ वर बंद झाला.
आरबीएल बँकेचा शेअर्स तब्बल १७.८३ टक्क्याने कोसळला. बँकेचे सीईओ सक्तीच्या रजेवर गेल्याने गुंतवणूकदारांनी आरबीएलच्या शेअर्सची विक्री करण्यास सुरूवात केली. दिवसभरात हा शेअर्स २० टक्क्यांपेक्षा जास्त आपटला. दिवसाअखेर तो १४१.७२ रुपयांवर बंद झाला.
सुरूवातीला सेन्सेक्स १७६ अंकांनी घसरून ५६,९४८ वर होता. दिवसभरात सेन्सेक्सने ५७,५१२ चा उच्चांक आणि ५६,५४३ चा नीचांक गाठला होता. सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी ५ शेअर्स घसरणीत आणि २५ वाढीने बंद झाले. एअरटेल, रिलायन्स, मारुती, इंडसइंड बँक आणि एशियन पेंट्स या कंपन्यांचे शेअर्स घसरले. तर डॉ. रेड्डी, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, कोटक बँक, अॅक्सिस बँक आणि सन फार्माच्या शेअर्सने वाढ नोंदवली.
सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप शुक्रवारी ते २५९.७८ लाख कोटी रुपये होते. ते सोमवारी २६१ लाख कोटी रुपयांवर गेले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६,९३७ वर उघडला. दिवसभरात त्याने १७,११२ ची वरची पातळी आणि१६,८३३ ची निम्न पातळी गाठली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी १० शेअर्स घसरणीसह आणि ४० वाढीसह बंद झाले. सिप्ला, टेक महिंद्रा, डॉ. रेड्डी आणि कोटक बँक या शेअर्समध्ये वाढ झाली.
इन्फोसिसचे मार्केट कॅप शुक्रवारी ८ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. कंपनीचा शेअर्स १९१३ रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर पोहोचला होता. सोमवारी हा शेअर्स १८६६  रुपयांवर बंद झाला. या शेअर्सने एका वर्षात ५० टक्के वाढ दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो १२२६ रुपयांवर होता.

Check Also

PNB ने सर्व सेवांवरील शुल्क वाढवले, जाणून घ्या कधीपासून लागू होणार आता किमान शिल्लक १० हजार रुपये

मराठी ई-बातम्या टीम देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) ने सर्व सेवांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *