Breaking News

 कडेकोड बंदोबस्तात पडद्यावर अवतरणार ‘पद्मावत’ मुंबईसह राज्यातील चित्रपटगृहांना पोलिस छावणीचे स्वरूप

मुंबई: प्रतिनिधी
प्रथम राजकारणाच्या आखाड्यात आणि नंतर न्यायदेवतेच्या मंदिरात उभ्या ठाकलेला ‘पद्मावती’ हा चित्रपट शीर्षक बदलून म्हणजे ‘पद्मावत’ या शीर्षकाने प्रदर्शित करण्यात येत आहे. राजपूत आणि करणी सेनेने दिलेल्या इशाऱ्यामुळे विविध राज्यांनी तसेच थिएटर मालकांनी सुरक्षेच्या कारणावरून ‘पद्मावत’च्या प्रदर्शनास नकार दिल्याने वादात अडकलेला हा चित्रपट अखेर प्रदर्शित होत आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये तसेच खासगी व सार्वजनिक मालमत्तेची हानी केली जाऊ नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
स्थानिक पोलिस बलाच्या जोडीला मुंबईसोबतच देशभरात काही ठिकाणी आरसीएफचे जवानही तैनात करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचवू पाहणाऱ्या शक्तींना आळा घालण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे समजते. सध्या ‘पद्मावत’चे वातावरण शांत असले तरी गरज भासल्यास शीघ्र कृती दलाचीही मदत घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून ठिकठिकाणांहून १०० पेक्षा अधिक व्यक्तींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सेन्सॅार बोर्ड आणि न्यायालयाच्या निकालानंतर ‘पद्मावत’चा मार्ग मोकळा झाला असला तरी काही असामाजिक तत्त्व चित्रपटाच्या नावाखाली गैरप्रकार करून सामाजिक वातावरण दूषित करण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ‘पद्मावत’ प्रदर्शित होत आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *