Breaking News

अॅट्रॉसिटी चित्रपटाला राम-लक्ष्मण यांचे वारस अमरचे संगीत

भारतीय संगीतक्षेत्रात काहींनी जोडीच्या रूपात संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यातल्या एका जोडी मराठी मनाबरोबरच हिंदी संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या मराठमोळ्या संगीतकारांची जोडी म्हणजे राम-लक्ष्मण यांची. या जोडीने हिंदीसह मराठीतही अनेक अप्रतिम संगीत रचनांनी अजरामर केली. मात्र ‘अॅट्रॉसिटी’या सामाजिक विषयावरील पहिल्याच आगामी मराठी सिनेमाला राम-लक्ष्मण यांचे वारस असलेल्या अमर राम-लक्ष्मण यांनी संगीत दिलं आहे.

आर. पी. प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’मधील गीतरचना संगीतकार अमर राम-लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. दिपक कदम यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र पडोळे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिपक कदम यांनी अॅट्रॉसिटी अॅक्टमागील सत्य मोठ्या पडद्यावर आणलं आहे. वास्तववादी कथानकाला सुमधूर संगीताची जोड देण्याची जबाबदारी अमर राम-लक्ष्मण यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या कथानकाशी एकरूप होणाऱ्या विविध मूडमधील गीतरचना ‘अॅट्रॉसिटी’मध्ये आहेत. गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी आणि विजय के. पाटील यांनी या चित्रपटातील गीतं लिहिली असून, आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू-अरोरा, शशिकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव आदि मराठीतील आघाडीच्या गायकांनी गायली आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीला सुमधूर संगीताची गोड परंपरा आहे. त्या परंपरेला साजेशा गीतरचना ‘अॅट्रॉसिटी’ या चित्रपटामध्ये असून रसिकांना त्या भावतील असं संगीतकार अमर राम-लक्ष्मण यांचं म्हणणं आहे.

कोरिओग्राफर अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी या चित्रपटातील गीतांचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. २ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, निखिल चव्हाण, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे आदि कलाकार आहेत. मधु कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं असून, छायांकन राजेश सोमनाथ यांचं आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *