Breaking News

मराठमोळ्या अभिनेत्रीने केले रस्त्यावर बसलेल्या आजीकडून केली दिव्याची खरेदी

दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करत आहेत. बॉलिवूडकरांच्या दिवाळी पार्ट्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे दादर, माहीम सह क्रोफेट मार्केट, हिंदमाता साडी मार्केट येथे नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.

दिवाळीत कंदील, लाईट्स आणि दिव्यांनी विद्युत रोषणाई केली जाते. दिव्यांच्या प्रकाशात सगळीकडे लखलखाट पाहायला मिळतो. अनेकजण दिवाळीत मेड इन इंडिया ला पसंती देत दिवे, कंदील खरेदी करतात. मराठमोळ्या अभिनेत्रीनेही रस्त्यावर दिवे विकणाऱ्या आजींकडून खरेदी केली आहे. अंशतः अभिनेत्री गौरी नलावडेने आजींकडून दिवाळीसाठी मातीचे दिवे खरेदी केले आहेत.

याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत गौरी आजींकडून दिवे खरेदी करताना दिसत आहे. गौरीने दिवे घेतल्यानंतर आजींनी खूश होऊन तिला दोन दिवे आणखी दिल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. “या दिवाळीसाठी मी हाताने तयार केलेल्या दिव्यांना पसंती दर्शविली. आज्जी खूश, मी खूश,” असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

किराया अडवाणी आणि सईद जाफरी यांच्यात आहे खास नाते

कियारा अडवाणी ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक हीट चित्रपट तिने दिले आहेत. सोशल मीडियावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *