Breaking News

केतकी माटेगावकर मुंबई प्रदूषणावर म्हणते की.. मुंबईतील प्रदूषणाबाबत केतकी माटेगावकर हिची सूचक पोस्ट

केतकी माटेगावकर ही मागील काही दिवसांपासून तिच्या अंकुश या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं रावी ही भूमिका साकारली. केतकी ही सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांची माहिती देत असते. तसेच केतकी ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट देखील शेअर करते. केतकीनं नुकतीच मुंबईमधील प्रदूषणाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केतकीनं महापालिकेकडे प्रदूषणाबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती केली आहे.

काय म्हंटल आहे पोस्टमध्ये वाचा

#मुंबई, ही गोष्ट गांभीर्याने विचारात घेण्याची गरज आहे, प्रदूषणात वाढ होत आहे! सर्वत्र लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास, धुळीची ऍलर्जी आणि व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत आहे. सुरू असलेली बांधकामे आणि इमारतींची कामे याकडे लक्ष देऊन खबरदारी घेणे आवश्यक आहे! जलस्त्रोतांजवळ कोणताही कचरा फेकण्याआधी विचार करावा. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती मी एक जागृत नागरिक म्हणून करत आहे.

केतकीचा अंकुश हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी रिलीज झाला होता. शाळा,टाईमपास, काकस्पर्श, फुंतरू, टाईमपास-2 या चित्रपटांमध्ये देखील केतकीनं काम केलं. आता अंकुश या चित्रपटानंतर केतकीच्या आगामी चित्रपटांची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. केतकी ही गायिका देखील आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मला वेड लागले प्रेमाचे,कसा जीव गुंतला,ओली ती माती, सुन्या सुन्या ही गाणी केतकीनं गायली आहेत. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Check Also

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *