Breaking News

देशाची अर्थव्यवस्था मंदीची असेल पण महाराष्ट्राची नाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी देशाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीत असल्याचे मत व्यक्त केले. परंतु महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असून राज्याच्या जीएसटीच्या उत्पन्नात कोणत्याही स्वरूपाची घट झालेली नसल्याचे सांगत मंदीचे सावट एकट्या भारतावरच नाही तर जगावर असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आर्थिक मंदीची परिस्थिती देशातच नव्हे तर जगातच असून चीन, जपान आदी देशांच्या प्रगतीची आकडेवारी कमी आहे. मात्र भारताच्या प्रगतीची आकडेवारी ही अमेरिकेच्या आकडेवारी इतकी आहे. तसेच इतर प्रगत देशांपेक्षा देशाची आर्थिक परिस्थिती अद्यापही चांगली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
मुंबईतील पारले-जी बिस्कीट समुहाला जीएसटी करप्रणालीमुळे १० हजार कामगारांना काढणार असल्याचे जाहीर केले. परंतु या कराची नेमकी कोणती अडचण त्यांना भेडसावत आहे. हे पाहिले पाहिजे असे सांगत तशीच जर अडचण होत असेल तर ती अडचण जीएसटी कौन्सिल समोर मांडू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Check Also

एचडीएफसीही आणणार दिर्घकालीन बॉण्ड ६० हजार कोटी रूपयांचे रोखे जारी करण्यास बोर्डाची मान्यता

एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने शनिवारी खाजगी प्लेसमेंट मोडद्वारे पुढील बारा महिन्यांत एकूण ₹६०,००० कोटी रुपयांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *