Breaking News

राज्याची वाटचाल ३० हजार रूग्ण संख्येकडे : तर मृतकांची संख्या एक हजारावर कोरोनाचे आज १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण २९ हजार १००

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ५० हजार ४३६ नमुन्यांपैकी २ लाख २१ हजार ३३६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २९ हजार १०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख २९ हजार ३०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १६ हजार ३०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या १०६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ३४,पुण्यात ६,अकोला शहरात २, कल्याण डोंबिवलीमध्ये२, धुळयात २,पनवेलमध्ये १,जळगाव १ तर औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ४४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २२ रुग्ण आहेत तर २३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ४९ रुग्णांपैकी ३२ जणांमध्ये (६५टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
*राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*
मुंबई महानगरपालिका: १७,६७१ (६५५)
ठाणे: १८९ (३)
ठाणे मनपा: १३०२ (११)
नवी मुंबई मनपा: ११७७ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४४४ (६)
उल्हासनगर मनपा: ८६
भिवंडी निजामपूर मनपा: ४१ (२)
मीरा भाईंदर मनपा: २६० (२)
पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: ३२१ (११)
रायगड: २१२ (२)
पनवेल मनपा: १८० (१०)
*ठाणे मंडळ एकूण: २१,९२५ (७१८)*
नाशिक: ९९
नाशिक मनपा: ६३
मालेगाव मनपा: ६६३ (३४)
अहमदनगर: ५६ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: १० (३)
धुळे मनपा: ६४ (५)
जळगाव: १९० (२३)
जळगाव मनपा: ५६ (४)
नंदूरबार: २२ (२)
*नाशिक मंडळ एकूण: १२३८ (७४)*
पुणे: १८५ (५)
पुणे मनपा: ३१४१ (१७२)
पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३५६ (२०)
सातारा: १२६ (२)
*पुणे मंडळ एकूण: ३९७२ (२०४)*
कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३७
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८६ (३)
*कोल्हापूर मंडळ एकूण: १६२ (५)*
औरंगाबाद:९५
औरंगाबाद मनपा: ६८३ (२०)
जालना: २१
हिंगोली: ६६
परभणी: ५ (१)
परभणी मनपा: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ८७१ (२१)*
लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ६
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
*लातूर मंडळ एकूण: ९६ (५)*
अकोला: १९ (१)
अकोला मनपा: २०७ (१३)
अमरावती: ६ (२)
अमरावती मनपा: ९२ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३
*अकोला मंडळ एकूण: ४५२ (२८)*
नागपूर: २
नागपूर मनपा: ३३२ (२)
वर्धा: २ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: ३४३ (३)*
इतर राज्ये: ४१ (१०)
*एकूण: २९ हजार १०० (१०६८)*

(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २२० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १४७३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार १६७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५८.९७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *