Breaking News

प्लाझ्मा थेरपीचा शोध कोणी आणि कधी लावला माहित आहे का? १९ व्या शतकात लावला पण कशासाठी

कोरोनावर मात करण्यासाठी आणि बाधितांचे प्राण वाचविण्यासाठी महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. ही मोठी उपलब्धता असून आपण मध्यम आणि गंभीर रुग्णांवर जिथे केअर नसलेल्या ठिकाणी प्लाझ्मा मशीन मागवत आहोत. केंद्रांमध्ये जमा केलेले प्लाझ्मा संकलित केले जाईल.
सीसीसीमधील रुग्ण जे बरे होऊन चालले आहेत, तिथे १० दिवसानंतर २८ दिवसाच्या प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन  आवाहन सरकारकडून करण्यात आले. डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात जी एखाद्या रोग्याला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.
अशा रीतीने प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग सर्वप्रथम १९ व्या शतकात एमिल व्होन बेहरिंग आणि तास्तो शिबासाबूरोव या दोन डॉक्टर्सनी करायचे ठरविले. डायपेथेरीया या जैविक आजारावर याचा प्रयोग करायचे ठरविले. त्याला यश मिळाले तेव्हापासून अशा रीतीने पॅसिव्ह उपचार करणे सुरु झाले.
एमिल व्होन बेहरिंग यांना जैविक आणि विषाणूजन्य आजारांवर उपचार पद्धतीसाठी नोबेल पारितोषक देखील मिळाले. यासंदर्भात जॉन्स हॉपकिन्सच्या डॉक्टरांनी देखील सांगितले आहे की, प्लाझ्मा थेरपीचा उपचार रुग्णांना बरे होण्यासाठी प्रभावीरीत्या होताना दिसतो. कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर्सनी अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करून रुग्णांवर उपचार करण्याचे ठरविले.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.
आयसीएमआरतर्फे देशभरात प्लाझ्माच्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत
एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

2 comments

  1. I like it when individuals get together and share views.

    Great website, keep it up!

  2. Wow,this parragraph is nice, my sister is analyzing these things, so I am going to convey her.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *