लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदरासंघातील शिवसेनेचे (शिंदे गटा) नेते रविंद्र वायकर यांची खासदारकीला अमोल किर्तीकर यांनी निवडणूक याचीकेतून आव्हान दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे उबाठा गटाला दणका मिळाला असून रविंद्र वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता तो गुरुवारी जाहीर केला. अमोल किर्तीकर यांची याचिका ऐकण्यायोग्य नाही. याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच टेंडर मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली हे दाखविण्यास किर्तीकर हे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळून लावावी हा रविंद्र वायकर यांच्यावतीने करण्यात करण्यात आलेला दावा न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवताना कीर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली.
मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान १२० टेंडर मते गहाळ झाली असून त्यांची मोजणी झालेली नाही. एकूण ३३३ टेंडर मे होती त्यापैकी १२० टेंडर मते मोजली गेली नाहीत. टेंडर मतांची फेरमोजणीची विनंती केली होती, पण ती नाकारण्यात आल्याचा दावा, अमोल किर्तीकर यांच्यातर्फे युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला होता. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर चुका झाल्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला. तसेच, मतमोजणी केंद्रात भ्रमणध्वनीचा वापर झाल्याचे दिसून आले. हा मुद्दा वारंवार निदर्शनास आणून देऊन तसेच गुन्हा नोंदवल्याच्या बाराव्या दिवसापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही किर्तीकरा यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. त्यामुळे, टेंडर मते ही या मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील वादाचे मुख्य कारण असल्याचा दावाही किर्तीकर यांच्यातर्फे करण्यात आला होता.
Marathi e-Batmya