Breaking News

कोरोना: गतवर्षीपेक्षा सर्वाधिक संख्या मुंबई आणि राज्यातही ३० हजार ५३५ नवे बाधित, ११ हजार ३१४ बरे झाले तर ९९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

साधारणत: गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू केल्यानंतर मार्च -एप्रिल २०२० या दोन महिन्यात १५ ते २५ हजाराच्या दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या दैंनदिन आढळून येत होती. मात्र मागील तीन दिवसांमध्ये २५ हजारापार आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल २७ हजार बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आज त्यात एकदम ३ हजार ५०० ची वाढ झाली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत मुंबईत साधारणत: १ ते २ हजाराच्या दरम्यान असणारी संख्या आता ३५०० हून अधिक झाली आहे.

तसेच मुंबई शहरात ३ हजार ७७९ इतके बाधित नोंदविले गेले आहेत. मुंबई महानगर प्रदेशात मुंबई शहरानंतर ठाणेमध्ये ९००हून अधिक, नवी मुंबईत ४०० हून अधिक, कल्याण-डोंबिवलीत ७०० हून अधिक, तर पनवेल मध्ये २०० हून अधिक बाधितांची संख्या आढळून आली आहे. तर राज्यात नाशिकमध्ये १५०० हून अधिक, जळगांवात १००० हून अधिक, पुणे येथे ४०००, सोलापूरात ४०० हून अधिक, औरंगाबादेत १७०० हून अधिक, नांदेडमध्ये १२०० हून अधिक तर नागपूरात ३५०० हून अधिक बाधित आज आढळून आले असून एकूण राज्यात ३० हजार ५३५ बाधित आढळल्याने एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख १० हजार १२० इतकी झाली. तर आज ११,३१४ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २२ लाख १४ हजार ८६७  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८.३२ % एवढे झाले आहे.

राज्यात आज ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३७७९ ३६२६७५ १० ११५८६
ठाणे ३०३ ४६४४८ १००७
ठाणे मनपा ६६६ ६९६१८ १२५४
नवी मुंबई मनपा ४६७ ६४५३७ ११६९
कल्याण डोंबवली मनपा ७६४ ७४९०८ १०८६
उल्हासनगर मनपा १२४ १२७५८ ३६५
भिवंडी निजामपूर मनपा ४२ ७२९७ ३४२
मीरा भाईंदर मनपा १७९ ३०४४४ ६७२
पालघर ६३ १७९३१ ३२१
१० वसईविरार मनपा १४४ ३३००७ ६३०
११ रायगड १४४ ३९८४० १००३
१२ पनवेल मनपा २९५ ३५५२० ६२४
ठाणे मंडळ एकूण ६९७० ७९४९८३ १६ २००५९
१३ नाशिक ९७४ ४५५३२ ८४२
१४ नाशिक मनपा १६६६ ९८७५३ १११०
१५ मालेगाव मनपा ८२ ६३५२ १७२
१६ अहमदनगर ४९८ ५४४८३ ७५९
१७ अहमदनगर मनपा २५६ २९४९२ ४२५
१८ धुळे १८६ १०६७६ १९०
१९ धुळे मनपा १८० १०५९१ १५०
२० जळगाव ११२६ ५५३६१ १२११
२१ जळगाव मनपा ३६८ २०२७० ३५३
२२ नंदूरबार ३२४ १४०७३ २३९
नाशिक मंडळ एकूण ५६६० ३४५५८३ १७ ५४५१
२३ पुणे १०९३ ११०१५७ २१८५
२४ पुणे मनपा २९७८ २४२६३३ १८ ४६६१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३५० ११८३३६ १३४९
२६ सोलापूर २२० ४६३९४ १२४१
२७ सोलापूर मनपा १८४ १५३०६ ६३६
२८ सातारा ३२६ ६२२८३ १८७३
पुणे मंडळ एकूण ६१५१ ५९५१०९ २७ ११९४५
२९ कोल्हापूर ३४ ३५२४३ १२६०
३० कोल्हापूर मनपा ३५ १५२८१ ४२५
३१ सांगली ८१ ३३९०५ ११६६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५९ १८६४७ ६३७
३३ सिंधुदुर्ग १७ ६८९३ १८३
३४ रत्नागिरी २२ १२५४६ ४२८
कोल्हापूर मंडळ एकूण २४८ १२२५१५ ४०९९
३५ औरंगाबाद ३१४ १९२२४ ३५३
३६ औरंगाबाद मनपा १४०० ४९९०६ ९६२
३७ जालना ५२१ १९४०४ ४०१
३८ हिंगोली १२६ ५९१४ १००
३९ परभणी १३० ५६८६ १७४
४० परभणी मनपा १२२ ५०४० १४४
औरंगाबाद मंडळ एकूण २६१३ १०५१७४ २१३४
४१ लातूर १६७ २३३३४ ४८५
४२ लातूर मनपा २०० ५२८२ २३७
४३ उस्मानाबाद १०६ १९१८८ ५८०
४४ बीड ३३५ २२७३९ ५८८
४५ नांदेड ४७४ १२०६१ ३९९
४६ नांदेड मनपा ८७९ १९२३२ ३०७
लातूर मंडळ एकूण २१६१ १०१८३६ २५९६
४७ अकोला २३२ ८८९६ १५२
४८ अकोला मनपा ३९९ १५२६७ २६३
४९ अमरावती १८५ १५५३६ २६०
५० अमरावती मनपा १४० ३०५४३ ३४२
५१ यवतमाळ ३७० २४७८२ ५१७
५२ बुलढाणा ५६८ २४०६४ २७३
५३ वाशिम २९८ १३०३६ १७४
अकोला मंडळ एकूण २१९२ १३२१२४ १९८१
५४ नागपूर ९१८ २८७५२ ८३८
५५ नागपूर मनपा २७४७ १६७७९४ १३ २८२६
५६ वर्धा ३७६ १८४९६ ३५१
५७ भंडारा १२१ १५३५३ ३१५
५८ गोंदिया ९० १५२३४ १७५
५९ चंद्रपूर १७९ १६७६७ २५८
६० चंद्रपूर मनपा ८३ १०२०२ १७१
६१ गडचिरोली २६ ९६१४ १०६
नागपूर एकूण ४५४० २८२२१२ २१ ५०४०
इतर राज्ये /देश १४६ ९४
एकूण ३०५३५ २४७९६८२ ९९ ५३३९९

आज नोंद झालेल्या एकूण ९९ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू पुणे-१८, नागपूर-४, अकोला-३, जळगाव-२, औरंगाबाद-१, रायगड-१, सातारा-१, ठाणे-१, आणि रत्नागिरी-१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *