Breaking News

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील रस्ते खड्डे विरहीत असावेत यासाठी एमएमआरडीएने रस्त्यांची तपासणी करावी. अवजड वाहनांची वर्दळ असलेले रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि हलक्या वाहनांची वर्दळ असलेले रस्ते यूटीडब्ल्यू तंत्राने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रालयात आज …

Read More »

बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुषखबरः कामावर घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले. परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन …

Read More »

महाराष्ट्र व गोवा राज्य उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवणार : प्रमोद सावंत

उद्योगात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रिकल्चर’ व गोवा सरकार आणि गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज उद्योग वाढीसाठी संयुक्त उपक्रम राबवतील अशी अपेक्षा गोव्याचे मुख्यमंत्री नामदार प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. इन्व्हेस्ट गोवा या गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत …

Read More »

रामदास कदम म्हणाले, आम्हाला १०० टक्के विश्वास धनुष्यबाण नाही मिळाला तर विचार करून पुढील दिशा ठरवू

शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. आज शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने आपआपली बाजू मांडल्यानंतर आयोग आपला निर्णय देईल. मात्र, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास काय? यावर शिंदे गटाचे नेते रामदास …

Read More »

निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे गटाला दिली उद्यापर्यंतची मुदत पक्ष आमच्या बाजुने; शिंदेच पक्षप्रमुख शिंदे गटाचा दावा

शिवसेना पक्ष कुणाचा? या प्रश्नी निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगी दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ७ ऑक्टोंबरपर्यंत शिंदे गट आणि ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार कागद सादर कऱण्याची मुदत आज संपली. मात्र आपल्याला शिंदे गटाची कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा ठाकरे गटाने आयोगासमोर करत १५ …

Read More »

नारायण राणे यांचा आरोप, उध्दव ठाकरेंनी छोटा शकील आणि राजनला सुपारी दिली शिवसेना सोडल्यानंतर आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा केला आरोप

शिवसेना सोडल्यानंतर मला ठार मारण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी छोटा शकील आणि छोटा राजन यांना सुपारी दिली होती असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला. तसेच मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करण्यास सदा सरवणकर यांना उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते असा …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या त्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, शब्द परत घ्या पटत नाही पण काही पथ्य पाळली पाहिजेत

काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री आता तर मुख्यमंत्री आहे, कार्टं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे. आताच नगरसेवक?, असं विधान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख केल्याने …

Read More »

डायव्हिंगमध्ये मेधालीचे स्वप्नवत सुवर्णपदक तर ऋतिकाला ब्रॉंझपदक ऋतिकाची पदकांची हॅट्रिक

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेधाली रेडकर हिने डायव्हिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. तिची सहकारी ऋतिका श्रीराम हिने ब्रॉंझपदक पटकावित येथे तिसऱ्या पदकाची नोंद केली. एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात मेधाली हिने लवचिकता व आकर्षक रचना याचा सुरेख समन्वय दाखवीत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील तिचे …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार, देवदर्शन व खुर्ची वाचवण्यातच गेले

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थाने करुन पाडून शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले. या १०० दिवसात ईडी सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत. राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक …

Read More »

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली ‘त्या’ निर्णयाच्या चौकशीची मागणी दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे …

Read More »