Breaking News

आनंद तेलतुंबडे जामीन प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगांव दंगलप्रकरणी ज्येष्ठ विचारवंत आणि प्राध्यापक डॉ.आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या जामिनाच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत तेलतुंबडे यांचा जामीन रद्द करावी अशी याचिका दाखल केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एनआयएने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत मुंबई …

Read More »

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारत जोडो यात्रा समन्वयक बाळासाहेब थोरात यांचे पत्र..

काँग्रेस खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. ही ऐतिहासिक पदयात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी महाराष्ट्रातील जनता, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी १४ दिवस उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राहुल गांधीबरोबर पायी चालत आपल्या समस्या, व्यथा, वेदना सांगितल्या व राहुल गांधी यांनीही त्या ऐकून घेतल्या. …

Read More »

महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांची तयारी

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांमध्ये तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी काल संबंधितास दिले. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात  …

Read More »

ईडीचे वाईट दिवसः न्यायालय म्हणते संजय राऊतांच्या जामीनावरील याचिका ऐकू शकत नाही

पीएमएलए अर्थात ईडी न्यायालयाने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या कथित पत्रा चाळ प्रकरणी जामीन मंजूर केला. मात्र ईडीने याप्रकरणी तातडीने संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु त्यावेळी उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास निकाल दिला. त्यानंतर पुन्हा एकदा ईडीने सुधारीत याचिका दाखल करत …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार बोलल्यानंतर उध्दव ठाकरे…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावरून सध्या राज्यातलं राजकारण तापलेलं असताना त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. या दोघांच्या वक्तव्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेंस आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना राज्यपाल कोश्यारी आणि भाजपावर तुटून पडलेले दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री …

Read More »

ज्योतिषाकडे हात दाखविल्यावरून मुख्यमंत्री म्हणाले, ज्याला दाखवायचाय होता त्याला…

काल अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द करत शिर्डी दौऱ्यावर गेले. तसेच साईबाब मंदीरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी एका ज्योतिषाकडे जात आपला हात दाखविल्याचा व्हिडिओ आज व्हायरल झाला. त्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर चांगलीच टीका होत असून राज्यानेच केलेल्या अंधश्रध्दा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात …

Read More »

उध्दव ठाकरेंची टीका, सध्याची राज्याची अवस्था म्हणजे कोणीही यावे आणि…

वृद्धाश्रमात ज्यांना जागा नाही त्यांना राज्यपाल म्हणून पाठवायचे हेच अत्यंत चुकीचे आहे. अशा राज्यपालांना हटवा. अधिक चांगला वृद्धाश्रम असेल तर तेथे पाठवा पण हे सॅम्पल आमच्याकडे नको अशा खोचक शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टिका केली. तसेच सध्या राज्याची अवस्था म्हणजे …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का ?

महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट व जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने हक्क सांगावा हे हास्यास्पद असून कर्नाटकच्या भाजपा सरकारचा हा आगाऊपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कर्नाटक सीमा वाद अद्याप न्यायप्रविष्ट असताना अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे चुकीचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आधी राज्यातील महत्वाचे प्रकल्प भाजपा शासित गुजरात व मध्य प्रदेशच्या घशात घातले …

Read More »

शिष्टाचारावरून तहसीलदाराच्या पत्राला वन अधिकाऱ्याचे खरमरीत उत्तर

राजकारणात मानापमान नाट्य गावपातळीवरून ते राष्ट्रीय पातळीवर सातत्याने आपल्याला अनेकविध पध्दतीने पहायला मिळते. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दोन वेगवेगळ्या विभागातील पदे समकक्ष कोणती आणि वरिष्ठ कोणती याचा उलघडा न झाल्याने पत्र पाठविण्याच्या पध्दतीवरून वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि महसूल यंत्रणेतील तहसीलदार यांच्यात पत्राद्वारे चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले. विशेष …

Read More »

वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

वीजबिल वसुलीसाठी गेलेले महावितरणच्या कर्मचाऱ्याना मारहाण करून शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवत अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने दंड व तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अमरावती येथील विश्वनाथ कॉलनीमध्ये राहणारे गणेश बळीराम तळोकार (५२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असुन ही घटना ऑक्टोबर २०१८ मध्ये अमरावतीतील फरशी स्टॉपस्थित …

Read More »