Breaking News

लवकरच ३ हजार ११० तलाठी भरती ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठयाकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. येत्या काही दिवसांमध्ये तलाठी भरती आणि …

Read More »

त्या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांचा सवाल, आपले मुख्यमंत्री गप्प का? कन्नडींगाकडून ट्रकला पुन्हा काळ फासलं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता आणखी विकोपाला गेला आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वाहनावर कन्नड रक्षण वेदिका संघटने कडून दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापलं होतं. हे वातावरण निवळत असताना आज पुन्हा कर्नाटकातील गदग मध्ये महाराष्ट्रातील एका ट्रकवर काळे फासण्यात आल्याचा प्रकार समोर येताच शिवसेना युवानेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी …

Read More »

अजित पवारांचा पलटवार, त्या निर्णयाबाबत फडणवीस धांदात खोटं बोलतायत तो निर्णय महाविकास आघाडीने घेतलाच नाही

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार असताना १३ मार्च २०२०, ३ मार्च २०२१, २० मे २०२१, ९ डिसेंबर २०२१ ला एक शासन निर्णय काढला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मागील सरकारच्या काळात कर्नाटक बँकेत पगार काढण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला तो साफ चुकीचा आहे. कर्नाटक बँक निकषात बसत नव्हती. काल …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा टोला, आता कर्नाटकसाठी महाराष्ट्रातील गावे पळवणार का? गुजरातमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून एकाबाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा सातत्याने अवमान केला जात आहे. तर दुसऱ्याबाजूला राज्यातील उद्योग पळवून नेले जात असताना कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातील गावांवर दावा केला जात आहे. या घडामोडींच्या विरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मोदी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत विविध ५०० कामांचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी निश्चितपणे करण्यात येतील. प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे केले जाईल. येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, मराठी बाहुल्य कमी कसे होईल यासाठी योजनाबध्द प्रयत्न कानडीचा द्वेष आम्ही करणार नाही

सीमाप्रश्न हा फार जुना प्रश्न आहेत. यात महाराष्ट्राची जी मागणी आहे तिला जनतेचा आधार आहे. आपण अनेक निवडणुकीमध्ये हा निर्णय लोकांचा आहे हे देशासमोर सिद्ध करू शकलो. अनेकदा याठिकाणी मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर तरीही काही होत नाही हे पाहिल्यानंतर लोक नाउमेद होतात. अशी परिस्थिती सध्या सीमा भागात झाली आहे. …

Read More »

नाना पटोले म्हणाले, निवडणूक निकालाने भाजपाची उलटी गिनती सुरु… गुजरातमध्ये वारेमाप दारु, पैसा व सरकारी यंत्रणेचा गैरवापर

देशभरातील निवडणुकांचे निकाल काँग्रेस पक्षासाठी समाधानकारक आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपाचा पराभव करून विजयाची पताका फडकवली आहे. तर राजस्थान व छत्तिसगड विधानसभा पोट निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दिल्ली महानगरपालिका, हिमाचल प्रदेश व गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती पण आता फक्त गुजरातमध्येच त्यांना सत्ता राखता आली. निवडणूक निकालाने …

Read More »

गुजरातच्या निकालावर शरद पवार म्हणाले, हळूहळू बदल होतोय… म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही

गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका …

Read More »

हिमाचल प्रदेश निवडणूकः पंतप्रधानांच्या विकासाला नकार देत जनतेचा कौल काँग्रेसला काँग्रेसची ३२ जागांवर विजयी घौडदौड तर ७ आघाडीवर भाजपा १८ ठिकाणी विजयी तर ८ आघाडी

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर भाजपा आणि आम आदमी पार्टीकडून मोठमोठ्या घोषणा करत निवडणूक विजयाचे दावे करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर भाजपाला मतदान म्हणजे मला मतदान असे आवाहन मतदारांना केले. तसेच डबल इंजिन सरकारमुळे हिमाचल प्रदेशच्या विकासामुळे हातभार लागेल असे आश्वासनही दिले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

गुजरात निवडणूकः भाजपा ९५ जागांवर विजयी तर ६१ ठिकाणी आघाडीवर काँग्रेस ७ ठिकाणी विजयी तर ९ ठिकाणी आघाडीवर, आप २ ठिकाणी विजयी तर २ ठिकाणी आघाडीवर

मोरबी दुर्घटनेनंतर गुजरातमध्ये लगेच विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. त्यामुळे या घटनेचा प्रभाव निवडणूकांवर काय पडणार याची उत्सुकता लागून राहिली होती. तसेच मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झीट पोलमध्ये गुजरातमध्ये भाजपाला १३० ते १५० विधानसभेच्या जागा मिळणार असल्याचे भाकित करण्यात आले. त्यामुळे एक्झीट पोलमध्ये वर्तविण्यात आल्याप्रमाणे भाजपाला जागा मिळणार की नाही अशी …

Read More »