Breaking News

नाना पटोलेंचा खोचक सवाल, देश कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने? नाव आणि चिन्ह काढून घेतलं तरी जनतेचा आशिर्वाद कसा काढून घेणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार ज्या महाशक्तीच्या जीवावर पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळेल असे सांगत होते ते अखेर प्रत्यक्षात आले आहे. त्यामुळे या देशातील स्वायत्त संस्था कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने असा …

Read More »

आयोगाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो… बाळासाहेबांचा विचार तीच खरी शिवसेना

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंडळींचं अभिनंदन करत होतो. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. कुणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार …

Read More »

निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, आयोगाने शेण खाल्ल, मग इतका खटाटोप कशासाठी? मोदींनी थेट लाल किल्ल्यावरून जाहिरच करावं

एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करत आपली भूमिका मांडताना केंद्रिय निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका …

Read More »

आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, लोकशाहीचा आणि राज्यघटनेचा हा विजय हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय...

आज दिवसभरात उध्दव ठाकरे यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयाने पहिला धक्का दिल्यानंतर संध्याकाळी केंद्रिय निवडणूक आयोगाने दुसरा धक्का देत शिवसेना हे पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. या निकालानंतर मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आनंद …

Read More »

मोठी बातमीः या एका चुकीमुळे ठाकरेंची शिवसेना- धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनाः वाचा निकालपत्र निवडणूक आयोगाने ७८ पानी निकालपत्रात दिली सविस्तर कारणे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकावित शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा केला. त्यावर उध्दव ठाकरे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देवू नये अशी मागणी केली. …

Read More »

फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले,… त्यांनाच विचारण्याची गरज त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं महत्व वाढवायचं नाही

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांच्यासोबत घेतलेला पहाटेच्या शपथविधी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतरच घेण्यात आला. त्यानंतर गणित काय बदलली हे अजित पवार …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले “मॅग्नेटिक महाराष्ट्र” ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’

केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच येत्या ऑक्टोंबरमध्ये “मॅग्नेटिक महाराष्ट्र” …

Read More »

एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तुम्हाला सविस्तर घटनाक्रमच सांगतो.. शिंदे गटाच्या बंडखोरीवर पहिल्यांदाच केले भाष्य

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी उलथवून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला २५ आमदारांना घेऊन बंडखोरी केली. त्यावेळी या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेतेच असल्याची चर्चा राज्याच्या वर्तुळात सुरु झाली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी कानावर हात ठेवत शिंदेंच्या बंडखोरीशी कोणताही संबध नसल्याचा सांगत हात झटकण्याचा प्रयत्न …

Read More »

नाना पटोलेंची टीका, ‘खोके’ सरकारकडे उधळपट्टीसाठी पैसे पण एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी नाही… मविआ सरकारवेळी एस. टी. विलिनीकरणाचा आग्रह धरणारे आता गप्प कसे?

शिंदे-फडणवीस सरकार एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करू शकत नाही. पगार होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी भिमराव सुर्यवंशी यांना आत्महत्या करावी लागली ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांचे प्रश्न लावून धरू, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले, …अखेर न्यायालयाला ठरवावं लागेल ठाकरे गटाची मागणी पाच सदस्यी घटनापीठाने फेटाळली

महाराष्ट्रासह देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बनलेल्या शिंदे आणि ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सलग तीन दिवस सुनावणी घेतली. या दरम्यान, नबाम रेबिया खटल्याचा संदर्भ देण्यात आला. तसेच पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने परिशिष्ट १० चा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. या साऱ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण किचकट असल्याचे स्पष्ट करत ही याचिका ७ …

Read More »