Breaking News

अजित दादांच्या त्या टीकेवर गुलाबराव पाटील यांचा पलटवार, सकाळी शपथ तर संध्याकाळी कोणा… शेवटी जनता हुशार

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली असून या निवडणूकीचा प्रचार संपताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांबाबत भविष्यवाणी करत …

Read More »

काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधींनी ‘प्रवासाचा समारोप’ असे सांगत दिले निवृत्तीचे संकेत भाजपा-आएसएसने सगळ्या संस्था नेस्तानाभूत केल्या

छत्तीसगडमधील रायपूर येथे दोन दिवसांपासून काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. काँग्रेसचे जवळपास १५०० प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गांधी कुटुंबियातील कोणीच हजर राहिले नसल्याने विविध चर्चांना उधाण आले. या अधिवेशनात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया …

Read More »

मुंबईकरांचे आरोग्य धोक्यातः बीएमसीच्या सर्व्हेक्षणात आढळून आली ही माहिती WHO STEPS सर्वेक्षण संपन्न व निष्कर्ष

असंसर्गजन्य रोग आजारात अंतर्भूत हृदयरोग, कर्करोग, मधुमेह व तीव्र श्वसनाचे विकार हे प्रामुख्याने मृत्यूचे कारण आहे. असंसर्गजन्य रोगामुळे २०१६ मध्ये जागतिक स्तरावर ४० दक्षलक्ष नोंदणीकृत मृत्यू आहे, हे प्रमाण जागतिक मृत्यूच्या एकूण ७१% असून भारतामध्ये हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ६१% इतके आहे. यासाठी महत्वाचे कारणीभूत घटक म्हणजे तंबाखूचे वाढते प्रमाण, …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवरून अजित पवारांची टीका, पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणूकीत फिराव लागतंय.. कसबा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा रोड शो

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा- शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्ही पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात ‘रोड शो’ केला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबतचे केंद्राचे पत्र केले जाहिर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव होणार

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने शुक्रवारी हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर होणार आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्याचे मूळ नाव कायम राहणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आज सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला …

Read More »

पर्यटन मंत्री लोढा यांची घोषणा, सावरकर यांचा आत्मार्पण दिन साजरा करणार राज्यात ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ सुरु करणार

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार,जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ राज्यात सुरु करण्यात येणार आहे. तसेच, नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी स्वा.सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला, तोंड लपवून पळणारा नाही….कृष्णेच्या का काठावर प्रायश्चित… लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता

पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभेत बोलताना विरोधी …

Read More »

या १०८ आदर्श आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा केला सन्मान गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

“विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल,” असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण कौशल्य विकास …

Read More »

शरद पवार यांची भाजपावर टीका, मी इतकी वर्षे भाजपावाल्यांना बघतोय पण त्यांची विधाने पोरकट एखाद्याच्या भाषणावर हरकत घेणे म्हणजे त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न...

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांची भेट घेतली. युवा वर्गातील मित्र-मैत्रिणींशी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत संवाद साधल्याचे समाधान शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेव्हा पुण्यात भेट दिली, त्याचवेळी मुख्यमंत्री व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या दोघांशी संवाद साधल्यानंतर …

Read More »

मासिक पाळी आल्याने सुट्टी द्याः सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, आम्ही निर्देश देऊ शकत नाही केंद्र आणि राज्य सरकारकडे जा सांगत याचिका फेटाळून लावली

सर्वोच्च न्यायालयाने नोकरदार महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान सुट्टी देण्याची मागणी करणारी याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सांगितले की, हा मुद्दा सरकारच्या धोरणाच्या कक्षेत येत असल्याने त्यावर इथे चर्चा होऊ शकत नाही. मासिक पाळीची सुट्टी देणे हा विषय केंद्र आणि …

Read More »