Breaking News

Editor

त्या १२ आमदाराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकालच घटनाबाह्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती

मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर या निकालावरून भाजपाकडून स्वागत तर सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयालयाच घटनाबाह्य निकाल दिलासा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्याने राजकिय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. सोलापूरमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर …

Read More »

शाळा, कॉलेज सुरू होण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करा - अजित पवार

मराठी ई-बातम्या टीम गेल्या काही दिवसापासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविड विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करून १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड …

Read More »

फडणवीसांच्या आरोपामुळे जनाब राऊत बावचळले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील सुपर मार्केट आणि १००० चौरस फुट क्षेत्रफळाच्या दुकानातून वाईन विक्रीस परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून टीकेचा सिलसिला अद्यापही सुरु असतानाच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मात्र फडणवीसांनी केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने थेट शिवसेना प्रवक्ते तथा नेते संजय राऊत यांच्यावर बा‌वचळल्याची खोचक टीका करत त्यामुळेच त्यांच झिंग …

Read More »

आणि अजित पवारांनी सांगितला भाजपा नेत्यांना वाईन आणि दारूतला फरक मद्यराष्ट्र टीकेवरून अजित पवारांनी साधला निशाणा

मराठी ई-बातम्या टीम राज्यात सुपर मार्केटसह एक हजार चौरस फुटाच्या दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर टीकेची झोड उठवित मद्यराष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका केली. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांभीर्याने घेत फडणवीसांना दारू अर्थात मद्य आणि …

Read More »

आढळलेल्या पेक्षा ९० टक्के जास्त रूग्ण बरे तर १०३ जणांच्या मृत्यूची नोंद २५ हजार नवे बाधित तर ११० ओमायक्रॉन रूग्ण पुण्यात

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी आढळून येत आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा ९० टक्के अधिक रूग्ण बरे होवून घरी गेले. मात्र दुसऱ्याबाजूला आज सर्वाधिक अशा १०३ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने थोडीशी चिंताजनक परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यात ओमायक्रॉनचे ११० रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ४५ …

Read More »

मी अध्यक्ष असताना न्यायालयाचे निर्णय विधानभवनात लागू न होण्याबाबत ठराव केला फडणवीसांच्या काळात तर रेशन दुकानात बिअर शॉपीचा निर्णय, ते औषध कोल्हापूरला जायला हवं

मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, मी विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने ठराव संमत केला की इतर उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होऊ देणार नाही. त्यामुळे …

Read More »

फडणवीसांनंतर केशव उपाध्ये आणि उर्मिला मातोंडकरांमध्ये “शब्द युध्द” केशव उपाध्ये आणि उर्मिला मातोंडकरांमध्ये ट्विटरवरच रंगली चकमक

मराठी ई-बातम्या टीम भाजपा आमदारांच्या निलंबनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने फडणवीसांच्या टीकेला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर दिल्यानंतर भाजपाचे केशव उपाध्ये यांनी मातोंडकर यांना वडाची साल पिंपळाला लावू नका असा सल्ला देत तुमच्या आमदारकीच्या प्रश्नी न्यायालयाने अद्याप काही सांगितले नसल्याचे ट्विट करत मातोंडकरांच्या मर्मावर बोट ठेवण्याचा प्रयत्न ट्विटद्वारे …

Read More »

आणि उर्मिला मातोंडकरांनी दिले फडणवीसांना खोचक उत्तर, “शोभेकरता का होईना…” १२ आमदारांच्या निलंबनानंतर ट्विट करत दिले उत्तर

मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयामुळे लोकशाहीचे संरक्षण झाल्याची प्रतिक्रिया ट्विटरद्वारे व्यक्त केले. त्यांच्या या ट्विटला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर देत म्हणाल्या की, तसेच शोभेकरता का असेना वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीवर …

Read More »

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सर्वोत्तम;‘पंतप्रधान बॅनर’विजेत्याचा बहुमान पृथ्वी पाटील ठरली देशातील सर्वोत्तम कॅडेट

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘पंतप्रधान बॅनर’चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त केला आहे. तर पृथ्वी पाटील एनसीसीच्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले. येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली …

Read More »

झोपडपट्टीवासियांनो, फक्त एसआरएवरच विश्वास ठेवा संस्था व विकासकावर नको एसआरएने केले आवाहन

मराठी ई-बातम्या टीम शहरातील झोपडपट्टीवासियांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी एसआरएकडून बायोमेट्रीक आणि ड्रोणद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. मात्र काही संस्था आणि विकासकांकडून एसआरएचे नाव पुढे करून झोपडपट्टीवासियांची माहिती जमा करत आहेत. यापार्श्वभूमीवर एसआरए अर्थात झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाने आज एक प्रसिध्दी पत्रक जारी करत बायोमेट्रीक आणि ड्रोण सर्व्हेक्षण करण्यासाठी कोणत्याही …

Read More »