Breaking News

Editor

नव्या सत्ताधाऱ्यांचे नऊ दिवस संपेना, आधी माईक, नंतर चिठ्ठी आणि आता कानात कुसफुस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेच्या कानात बोलत करून दिली आठवण एमएमआरडीएची

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवून देत नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी झाला. मात्र या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्य मंत्रिमंडळाचा कारभार हाकत आहेत. मात्र या सरकारच्या नव्याचे नऊ दिवस काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

इंडिया रॅकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ शैक्षणिक संस्था देशात पहिल्या ५० आणि १०० त उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष क्रमवारीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

उच्च शैक्षणिक क्षेत्रातील सर्वंकष १०० उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या १२ शैक्षणिक संस्थांच्या समावेशसह देशात राज्याने दुसऱ्या क्रमांक पट‍काविला आहे. यासह प्रथम दहामध्ये मुंबई आयआयटी तिसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘इंडिया रँकिंग -२०२२’ हा कार्य‍क्रम इंडिया हॅबीटेट सेंटरच्या स्टेन सभागृहात आयोजित करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान, केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मुर्ती, …

Read More »

शरद पवार म्हणाले; हुकूमशाही विरोधातील आवाज उठविण्याची किंमत मोजतोय सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोक त्याविरोधात आवाज उठवतात

जगामध्ये जिथे – जिथे हुकुमशाही आली, ती लयास गेली. श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात सामान्य लोकं घुसली आणि सत्ताधारी कुटुंब देशाबाहेर निघून गेले. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोकं त्याविरोधात आवाज उठवतात, हे श्रीलंकेत दिसून आले असा इशारा देतानाच भारतातही जे काही घडत आहे, त्याची चिंता न करता आपण एकसंध …

Read More »

छगन भुजबळ यांचा टोला; सरपंच-नगराध्यक्ष थेट लोकांमधून पण मुख्यमंत्री तर फुटीर गटातून ओबीसींची लोकसंख्या ही ५४ टक्के असून ओबीसींच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळालेच पाहिजे

देशात ओबीसींची लोकसंख्या ही ५४ टक्के असून ओबीसींच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळालेच पाहिजे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर आहे. कोरोनामुळे अद्यापही देशात जनगणना होऊ शकली नाही. आता देशात जनगणना सुरु करून त्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करून घ्यावी अशी …

Read More »

अखेर “या” कारणामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले… राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसल्याने विधिमंडळाचा निर्णय

राज्यात सत्तांतर होत बंडखोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. मात्र शिंदे-फडणवीसांचा शपथविधी होवून १५ दिवस उलटले तरी या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे उद्या जावून विधिमंडळ अधिवेशन बोलावले तर विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे कोण जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे …

Read More »

मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते संकेताला धरून नव्हते पण… नामांतरप्रश्नी केली भूमिका स्पष्ट

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नामांतर करण्याचा घेतलेला निर्णय नव्याने स्थापन झालेल्या शिंद-फडणवीस सरकारने स्थगित केला. त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली. या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नामांतर करायचे असून तो बेकायदा निर्णय कायदेशीर ठरविण्यासाठी उद्या सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेवून निर्णय घेणार …

Read More »

राष्ट्रवादी म्हणते, बुलेट ट्रेनला मंजुरी म्हणजे गुजरातसमोर झुकण्याचा प्रकार प्रवक्ते महेश तपासे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी एमएमआरडीएची बीकेसीतील जागा अडवून ठेवण्यात आली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत निर्णय घेत एमएमआरडीएची जागा केंद्र सरकारला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेत त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांवर …

Read More »

संजय राऊतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केवळ ‘त्या’ गोष्टीसाठी उद्या शिक्कामोर्तब नामांतराचा निर्णय बेकायदेशीर होता मात्र आता तो कायदेशीर होणार

शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. मात्र राज्य सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

लोकसभेच्या असंसदीय शब्दांच्या नव्या यादीवर शरद पवार म्हणाले, ते बघूनच… लोकसभा अध्यक्षांनी अजून त्याची अंमलबजावणी सुरु केली नाही

लोकसभा अध्यक्षांनी नव्याने असंसदीय शब्दांची एक यादी जारी केली आहे. या यादीमध्ये लोकसभेत मोदी सरकारवर टीका करणाऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच शब्दांना असंसदीय शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे टीका करण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे शब्दच असंसदीय ठरविण्यात आल्याने राष्ट्रीयस्तरावर काँग्रेससह अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यापार्श्वभूमीवर …

Read More »

शिवसैनिकांवरील हल्ल्यावरून उध्दव ठाकरे म्हणाले, तर आम्ही शांत बसणार नाही… पोलिसांनी राजकारणात पडू नये

मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापैकी खरी शिवसेना कोणाची? यावरून रस्सीखेच सुरु असतानाच भायखळ्यातील शाखा क्रमांक २०८ चे शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. मात्र पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे …

Read More »