Breaking News

Editor

चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काय दादा कालपर्यंत पोरं-टोर बोलत होते आता तुम्हीही… मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहेत असे म्हणायचं का?

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाले. त्यातील ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या आरोपाचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल टीपण्णी करत म्हणाले की, काय …

Read More »

निकालानंतर उध्दव ठाकरे यांचा टोला, एवढ्या वर्षाच्या भ्रमातून कसबा बाहेर आला… भाजपची निती वापरा आणि फेका, शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत वापर केला

पुणे शहरातील कसबा पेठ निवडणूकीत २८ वर्षानंतर भाजपाचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाला खोचक शब्दात टोला लगावला. निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, एवढ्या वर्षांच्या भ्रमातून कसबा बाहेर आला आता देशही बाहेर पडेल, …

Read More »

छगन भुजबळ यांचा सवाल, बेरोजगारांच्या आत्महत्या ; बेरोजगारी वाढण्यासाठी जबाबदार कोण ? राज्यातील उद्योगातील गुंतवणूक, रोजगार यासह अनेक योजनांची स्पष्टता नाही

महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारांची आत्महत्या झाली आहे. राज्यातील तरुणांना रोजगाराचा प्रश्न अतिशय गंभीर असून उद्योग वाढविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी करत राज्यपालांच्या अभिभाषणात राज्यात उद्योगातील गुंतवणूक, रोजगार यासह अनेक महत्वाच्या योजनांबाबत कुठलीही स्पष्टता दिसत नाही असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करतांना व्यक्त केले. विधानसभेत …

Read More »

शरद पवारांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या राम सातपुतेच्या विरोधात राष्ट्रवादी आमदार आक्रमक… अखेर भाजप आमदार राम सातपुतेंनी मागितली माफी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या भाजपा आमदार राम सातपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना सभागृहातच माफी मागावी लागली. विशेष म्हणजे भाजपा आमदार आशिष शेलार …

Read More »

विरोधकांचा आक्षेपः मात्र मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा, देशद्रोह्यांविरोधात बोलणे गुन्हा असेल तर…. हक्कभंग प्रस्तावावर निर्णय नसताना मुख्यमंत्र्यांना खुलासा करण्याची दिली संधी

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारवर महाराष्ट्र द्रोही अशी टीका केली. तर त्यास प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उद्देशून देशद्रोह्याच्या साथीदारांबरोबर चहा पिण्याची वेळ आली नाही असा पलटवार केला. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याप्रकरणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विरोधकांनी …

Read More »

बाळासाहेब थोरातांचा टोला, जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करत इतिहास घडवला धंगेकरांच्या कसबा पेठेतील विजयानंतर काँग्रेस नेते थोरात यांचा भाजपाला टोला

कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात …

Read More »

भास्कर जाधवांनी काँग्रेसचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, नीट लक्षात ठेवा, ५० वर्षे विरोधी पक्षात… सूडाने सत्ता राबवू नका, विरोधकांची विकासकामे रोखू नका

विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेर सध्या उध्दव ठाकरे यांच्या गटात जे काही अभ्यासू वक्ते राहिले आहेत. त्यामध्ये कोकणातील आमदार भास्कर जाधव यांचे नाव आवर्जून घेण्यात येते. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर करत कायदेशीर संस्थांचा कसा वापर करण्यात येतो हे सोदाहरण विधानसभेत भास्कर जाधव यांनी सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला इशारा देत म्हणाले, …

Read More »

विशेषाधिकार समितीतील सदस्यांवरून शरद पवार म्हणाले, तक्रादारासच न्यायाधीश बनविले तर… विधानसभा अध्यक्षांनी समितीतील निवडीचे समर्थन केल्यानंतर शरद पवारांचा टोला

लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्वीट करत …

Read More »

विशेषाधिकारी समिती सदस्यांवर विरोधकांचा आक्षेपः तर अध्यक्ष नार्वेकरांकडून समर्थन ज्यांनी हक्कभंग दाखल केला ते वादी असतात तेच समितीत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यावरून सध्या विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांचे वक्तव्य तपासून त्याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या हक्कभग प्रस्तावावर कारवाई करायची की नाही याबाबत विशेषधिकारी समिती स्थापन …

Read More »

न्यायालयाचे आदेश, आयुक्त नियुक्तीसंदर्भात नवा कायदा, तोपर्यंत या समितीच्या… सर्वोच्च न्यायालयाच्या पध्दतीप्रमाणे कोलेजियम पध्दत अवलंबण्याचे निर्देश

मागील काही वर्षांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तांच्या भूमिकेसंदर्भात आणि त्यांच्या निवडीसंदर्भात भाजपा वगळता सर्वच राजकिय पक्षांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यातच विद्यमान केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी शिवसेनेप्रश्नी दिलेल्या निकालामुळे आयुक्तांच्या हेतू विषयी नव्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्तांच्या नेमणूकीसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देत निवडणूक …

Read More »