Breaking News

Editor

पोट निवडणूकः महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाला “कही खुशी कही गम” लक्ष्मण जगताप यांची जागा भाजपाला राखण्यात यश, तर २८ वर्षानंतर भाजपाकडून काँग्रेसने मतदारसंघ हिसकावून घेतला

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाली. या दोन्ही जागां राखण्यासाठी भाजपा-शिंदे गटाकडून आणि महाविकास आघाडीने कंबर कसली. त्यामुळे २८ वर्षापासून भाजपाच्या ताब्यातील जागा काँग्रेस हिसकावून घेणार का? चिंचवडची जागा परत मिळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळणार …

Read More »

राऊत यांच्यावरील कारवाईसाठी भाजपा आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली शिस्तभंग समिती ठाकरे गटाचा एकही सदस्य नाही शिंदे गटाचे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांचा समावेश

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंडाचे निशाण फडकाविणारे एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांवर टीका करण्याच्या नादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सध्याचे विधिमंडळ हे विधिमंडळ नसून चोर मंडळ असल्याचे वक्तव्य केले. यावरून विधिमंडळाच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत पडसाद उमटत हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. तसेच …

Read More »

गॅस दरवाढीवरून “अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको” म्हणत राष्ट्रवादीचा मोदींना टोला तुम तो हर सीतम बेमिसाल करते हो’,गालिबच्या शायरीतून महेश तपासे यांचा मोदींवर निशाणा...

“अब किस किस सीतम कि मिसाल दु तुमको”, तुम तो हर सीतम बेमिसाल करते हो’, या गालिबच्या शायरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गॅस दरवाढीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षात चारवेळा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असताना यावर्षीही होळी सणाच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरच्या …

Read More »

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करा ९ मार्चपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज ९ …

Read More »

शिंदे गटाचा न्यायालयात युक्तीवाद,…तरी ठाकरे सरकारला बहुमत नव्हते त्यावर सरन्यायाधीश म्हणाले जर अपात्रतेचा निर्णय झाला असता तर चित्र वेगळे

एकीकडे राज्यात अधिवेशनामुळे वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीमुळेही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाचे प्रतोद, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र अशा अनेक मुद्द्यांवर नीरज कौल शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करत होते. यावेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल म्हणाले, अपात्रतेची याचिका प्रलंबित असलेल्या ४२ आमदारांना …

Read More »

नाना पटोलेंची स्पष्टोक्ती, राऊतांच्या विधानाला समर्थन नाही; अध्यक्षांनी निर्णय द्यायला हवा होता गॅस दरवाढ, महागाई, शेतकरी प्रश्नांवर विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

खासदार संजय राऊत यांनी विधानमंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. विधिमंडळाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, तो राज्याच्या जनतेचाही अपमान आहे. भाजपाने त्यासंदर्भात हक्कभंग ठराव आणला होता. सभागृहात कोणाचाही विरोध नव्हता. अध्यक्षांनी यावर तातडीने निर्णय द्यावा व जनतेचे प्रश्नही महत्वाचे आहेत. त्यावर चर्चा व्हायला हवा होती …

Read More »

शिंदे गटाच्या दाव्यावर सरन्यायाधीशांचे मोठे विधान, १० व्या परिशिष्टानुसार त्याला काही महत्व नाही.. दिलेल्या तारखानुसार पक्षात २१ जूनपासूनच फूट दिसतेय

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून आक्रमक युक्तिवाद करत ठाकरे गटाचे मुद्दे खोडले जात आहेत. अशातच आज बुधवारी सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी मांडलेला एक मुद्दा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नाकारला आहे. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी १० व्या परिशिष्टाचा संदर्भ देत आपले मत व्यक्त केले. सर्वोच्च …

Read More »

विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव आल्यानंतर संजय राऊत म्हणाले, मी तुरुंगात गेलेला माणूस… हक्कभंग आणला तर मी माझं म्हणणं मांडेन

संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी कोल्हापूरात बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. त्यांच्या या विधानानंतर शिंदे-भाजपाने आक्रमक भूमिका घेत संजय राऊतां विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. तसेच सभागृहाच्या बाहेरही सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडत संजय राऊत यांच्यावर टीका केली. विधिमंडळात …

Read More »

संजय राऊतांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस सवाल, मग उध्दव ठाकरेही चोर मंडळाचे सदस्य ? विधान परिषदेत बोलताना फडणवीसांचा सवाल

संजय राऊतांनी आज कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले. तसेच त्याचे पडसाद विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. विधान परिषदेत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणे हे सहन करण्यासारखं नाही. …

Read More »

संजय राऊतांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसादः पण हक्कभंग प्रस्तावावर अध्यक्षांची स्पष्टोक्ती दोन दिवसात तपासणी करून हक्कभंगाबाबत निर्णय घेऊ

संजय राऊतांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधताना राज्यात विधिमंडळ नाही, तर ४० जणांचे चोरमंडळ, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले असून या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. तसेच …

Read More »