Breaking News

Editor

१५० रू.त महिनाभराचे राशन बाजारात मिळते का हो? गतिमान सरकारचा सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

कोरोना काळापासून संपूर्ण देशभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. त्यातच महागाईचा आगडोंब उसळलेला असतानाच अनेक सर्वसामान्य नागरीकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तर दुसऱ्याबाजूला ८ वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील तीन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासन दिलेले असताना राज्यातील एकाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट सोडा शेतीसाठी केलेला खर्चही मिळणे दुरापास्त …

Read More »

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत ०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली …

Read More »

कपिल सिब्बल यांच्या आवाहनाला उध्दव ठाकरे पाठिंबा देताना म्हणाले… लोकशाही वाचविण्यासाठी स्वतंत्र विचारमंचात सहभागी

२०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित रालोआने विजय मिळवित केंद्रात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून आतापर्यंत राज्यघटनेतील तरतूदींना हरताळ फासत अनेक शासकिय यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घेत विरोधकांना बेमालूमपणे मोडून काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेतील विभाजनावरून आणि निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका याबाबत …

Read More »

ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेला भाजपा-शिंदे गटाकडून आशिर्वाद यात्रेचे प्रत्युत्तर सहा लोकसभा क्षेत्रात होणार आशीर्वाद यात्रा-भाजपा नेते आशिष शेलार

मागील दोन-तीन दिवसांपासून ठाकरे गटाची शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या निमित्ताने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे आदी राज्याच्या विविध भागात दौऱ्याच्या निमित्ताने भाजपा, शिंदे गटाच्या विरोधात जाहिर सभा घेत आहेत. यापार्श्वभूमी भाजपा या यात्रेला प्रत्युत्तर म्हणून रविवारपासुन मुंबईत सहा जिल्ह्यात …

Read More »

पुतीन यांच्या हस्ते सत्कार झालेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिकांची हत्या स्पुटनिक व्ही लसीच्या वैज्ञानिक चमुत आंद्रे बोटीकोव्ह हे होते

कोरोनावरील स्पुटनिक व्ही ही रशियन लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांच्या चमुतील एका वैज्ञानिकाची बेल्टने गळा आवळून हत्या करण्यात आली. आंद्रे बोटीकोव्ह असं या वैज्ञानिकाचे नाव आहे. याप्रकरणी २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ४७ वर्षीय आंद्रे बोटीकोव्ह हे गमलेया …

Read More »

विधानसभेच्या नोटीसीवर संजय राऊत म्हणाले, हवं तर मला तुरुंगात टाका अजूनही दौऱ्यात आहे घरी पोहोचल्यावर कळेल

शिंदे गटाला उद्देशून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सध्याचे विधिमंडळ हे ४० चोरांचे विधिमंडळ असल्याचे वक्तव्य केल्याने विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्यावतीने संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. तसेच या हक्कभंगाच्या अनुंगाने विधानसभेच्या विशेषाधिकार समितीने राऊत यांना नोटीसही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेच्या …

Read More »

नामांतरावरून खा. इम्तियाज जलील यांचा सवाल, महाराजांनी सांगितले का? शहराला नाव देऊन….. हिमंत असेल तर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी औरंगाबादेतून निवडणूक लढवावी

राज्यातील सत्तांतरापासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराच्या घोषणेला अखेर केंद्र सरकारने मान्यता देत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने राज्य सरकारला पाठवले. त्यानंतर राज्य सरकारने दोन्ही शहरांची नावं बदलण्याची अधिसूचना जारी केली आहे. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, तर …

Read More »

तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बँनर्जी यांच्या “या” घोषणेने आघाडीला ब्रेक सागर दिघी पोट निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बँनर्जी यांचा एकला चलो चा नारा

कन्याकुमारी ते काश्मीर दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत देशातील भाजपाच्या हिंदूत्ववादी राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न केला. तसेच भारत जोडो यात्रेला देशातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळल्याने भाजपाला त्याची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी धर्मनिरपेक्षवादी राजकिय पक्षांकडून आघाडी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच तृणमुल काँग्रेसच्या …

Read More »

रेल्वे तिकिट बुक करायचंय, मग फक्त बोला बुकिंग झालंच म्हणून समजा आयआरसीटीसीच्या प्रवाशांसाठी लवकरच चॅट बोट

संपूर्ण भारतात मोदी सरकारकडून विविध विकास कामांची घोषणा करण्यात येत आहे. मात्र त्यातील किती कामे मार्गी लागली किती नाही याची विभागवार आकडेवारी कधी तरी समोर येईल. मात्र देशातील भारतीय रेल्वेच्या विकास कामांच्या माध्यमातून विकास कामे सुरु असल्याचा प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वे प्रवाशांना …

Read More »

१२ वी प्रश्नपत्रिकेतील त्या चुकलेल्या प्रश्नांच्या बदल्यात विद्यार्थ्यांना मिळणार ६ गुण राज्य मंडळाच्या बैठकीनंतर सचिव अनुराधा ओक यांची माहिती

नुकत्याच झालेल्या १२ वी परिक्षे दरम्यान इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांच्या ऐवजी मॉडेल उत्तरच छापण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना या चुकीच्या प्रश्नांमुळे मनस्ताप सहन करावा लागला. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकले होते. ही माहिती पुढे आल्यानंतर विषय तज्ज्ञ आणि मुख्य नियामकांच्या संयुक्त सभेत या चुकलेल्या प्रश्नांबाबत चर्चा झाली. संयुक्त सभेच्या अहवालानुसार …

Read More »