Breaking News

Editor

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन कर्करोगाने वयाच्या ८९ व्या वर्षी निधन

पुणे : प्रतिनिधी राज्यातील एकेकाळचे समाजवादी चळवळीचे अर्धव्यु भाई उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांचे सोमवारी सांयकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांना स्वादू पिंडाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर पूना हॉस्पीटल येथे उपचार करण्यात येत होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा अभिजित, सून आणि नातवडे असा …

Read More »

क्लीन चीट दिलेल्या घोटाळेबाज उद्योग मंत्री सुभाष देसाईंना बडतर्फ करा बक्षी समितीने मंत्री देसाईंवर ठपका ठेवल्याचा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी औद्योगिक वापरासाठी अधिसूचित केलेल्या जमिनी विनाअधिसूचित करताना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी एककल्ली व नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेतल्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या चौकशीतून निष्पन्न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे …

Read More »

भारत बंद: दलित, डाव्या संघटनांचा मुंबईत मोर्चा दादर प्लाझा ते चैत्यभूमी दरम्यान काढलेल्या हजारो मोर्चेकरी सहभागी

मुंबई : प्रतिनिधी देशातील दलित-आदीवासी समाजावर करण्यात येणाऱ्या अन्यायाला प्रतिबंद करणाऱ्या अँट्रोसिटी कायद्यात शिथिलता आणणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत या दोन्ही समुदायाचे सामाजिक अस्तित्व धोक्यात आले. या निकालाच्या विरोधात केंद्र सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी मुंबईत दलित समाजातील सर्व सघटना, डावे पक्ष आणि संघटनांनी दादर प्लाझा ते चैत्यभूमी …

Read More »

अखेर अनाथ मुलांना १ टक्के आरक्षण मिळणारच शासन निर्णय प्रसिध्द

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध अनाथ आश्रमात राहणाऱ्या अनाथांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जगण्यासाठी जातीपासूनच्या सर्व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुला-मुलींना शासकिय नोकऱ्यांपासून ते शासकिय लाभापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी पात्र होता येत नव्हते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथांना १ …

Read More »

भारत बंद : मुंबईत व्यवहार सुरळीत ठिकठिकाणी मोर्चे काढत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात नाराजी व्यक्त

मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने अँट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणण्याच्या अनुषंगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्व दलित, मागासवर्गिय, डावे पक्ष आणि पुरोगामी संघटनांनी २ एप्रिल रोजी पुकारलेल्या भारत बंदला मुंबईत थंड प्रतिसाद मिळाला असून दुपारी भीम आर्मी या सामाजिक संघटनेने वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पुर्नविचारार्थ सरकारने …

Read More »

अमराठी भाषिकांना मराठी भाषा शिकण्याचे दरवाजे उघडले राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

मुंबई : प्रतिनिधी अमराठी भाषिक लोकांकरिता राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभाग यांनी मराठी भाषा अध्ययन पध्दत हा प्रकल्प संयुक्तरित्या हाती घेतला आहे. जगात कुठेही, कोणालाही मराठी भाषा शिकण्यासाठीचे परिपूर्ण साधन आजघडीला यामुळे निर्माण होण्यास मदत होणार आहे. गेल्या १०० वर्षांत जर्मन भाषा अध्यापनाच्या क्षेत्रात प्रचंड संशोधन आणि विकास …

Read More »

अखेर राज्य सरकारकडून घर बांधणी क्षेत्रात आर्थिक मंदी असल्याची कबुली शासकिय दरात अर्थात रेडीरेकनरच्या दरात वाढ नाही

मुंबई : प्रतिनिधी नोट बंदी, जीएसटी करप्रणाली आणि रेरा कायद्यामुळे राज्यातील घर बांधणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी आलेली आहे.त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जमिन आणि बांधकाम क्षेत्राचे शासकिय वाढीव दर राज्य सरकारने न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तसे आदेश ही राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागाने जारी केलेल्या आपल्या आदेशात म्हटले …

Read More »

इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. मराठी चित्रपट परदेशी जाणार कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड

मुंबई : प्रतिनिधी मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये ८ मे २०१८ ते १८ मे २०१८  या कालावधीत होणा-या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणा-या ३ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेले चित्रपट पुढीलप्रमाणे- १) इडक (मे.किया फिल्मस प्रा.लि.), २) क्षितीज (मे.मिडिया फिल्म क्राफट), ३) …

Read More »

प्रेम विवाह करणाऱ्यांनो आता निर्धास्त रहा आंतरजातीय विवाहासाठी लवकरच होणार स्वतंत्र कायदा

मुंबई : प्रतिनिधी तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या किंवा तारूण्यात असलेल्या अनेक तरूण-तरूणी वेगवेगळ्या जातीची, धर्माची आणि पंथाची असतात. मात्र प्रेम या एका धाग्यामुळे ते दोघेजण वेगवेगळ्या जातीची असली तरी एकत्र जीवन जगण्यासाठी रूढी-परंपरा आणि समाजाची बंधने जुगारून आंतरजातीय विवाह करतात. आता अशा आंतरजातीय विवाह करणाऱ्या दांपत्यांना संरक्षण मिळावे, जातीय सलोखा राखण्यासाठी महिलांना …

Read More »

दलित, डाव्या संघटनांच्या भारत बंदच्या इशाऱ्यानंतर सरकारला आली जाग सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचा मंत्री बडोले यांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी अधिकारी किंवा व्यक्तीविरुध्द विना चौकशी गुन्हा दाखल करता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत केंद्र आणि राज्य सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीवरून सोमवारी २ एप्रिल रोजी भारत बंदची घोषणा राज्यासह देशभरातील दलित, डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी भारत बंदची हाक …

Read More »