Breaking News

कृषी

शरद पवार म्हणाले, …शुध्द बेण्याचा वापर वाढला पाहिजे हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे

भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. …

Read More »

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक शेतकरी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटनप्रसंगी डॉ.बसंत कुमार दास यांचे वक्तव्य

देश धान्य उत्पादनात प्रगतीवर आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ.बसंत कुमार दास यांनी केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्यानिमित्त शेतकरी विज्ञान काँग्रेसचे …

Read More »

शेतजमिनीचा वाद सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने आणली ‘सलोखा योजना’ शेतजमिन अदलाबदल करण्यासाठी फक्त एक हजार रूपये मुद्रांक शुल्क

राज्यातील अर्ध्याहून अधिक भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून आणि वहिवाटीवरून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये वाद आहे. या वादामुळे अनेक वेळा खून किंवा मारामाऱ्या तर कधी कोर्टकज्जे आदी होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते. यापार्श्वभूमीवर राज्यातील बांधाला बांध लागून असलेल्या शेतकऱ्यांमधील वाद मिटावा या उद्देशाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘सलोखा योजना’ जाहीर केली. शेतकर्‍यांमध्ये …

Read More »

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार मंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक नियुक्त करून बी-बियाणे, खते यांचे गोडाऊन तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. अशा बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी …

Read More »

साखर कारखान्यांची फसवणूक टाळण्यासाठी लवकरच बैठक सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती

ऊस गाळप हंगामात ऊस तोड मजूर पुरविणे आणि वाहतुकीचे करार गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाच्या माध्यमातून होण्यासाठी साखर कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ९ जानेवारी २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

अजित पवारांची मागणी, शेतमजूरांची, ट्रॅक्टर वाहतूकदार शेतकऱ्यांच्या मुलांची फसवणूक थांबवा आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादम-कंत्राटदारांवर कारवाईसाठी यंत्रणा- सरकारकडून घोषणा

राज्यातील साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणारे, ऊस वाहतूक करणारे कंत्राटदार-मुकादम साखर कारखान्यांकडून आगाऊ उचल घेऊनही काम पूर्ण करत नाहीत. उसतोडणीचे काम अर्धवट सोडून पळून जातात. ऊसतोड मजूरांचे, ट्रॅक्टर खरेदी करुन ऊसवाहतूक व्यवसाय करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांचे, शेतकऱ्यांच्या मुलांचे पैसे बुडवतात. यामुळे शेतमजूरांवर उपासमारीची, शेतकऱ्यांच्या मुलांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. उलटपक्षी …

Read More »

सप्टेंबर २०२३ पर्यत लंपी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानपरिषदेत माहिती

राज्यातील ३३ जिल्ह्यात एक लाख ७८ हजार ७२ गोवर्गीय जनावरे लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. मात्र वेळेत १०० टक्के लसीकरण केल्याने पशुधनाचा मृत्यू कमी झाला आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात …

Read More »

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करा पशुसंवर्धन आयुक्त यांचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण  वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ११ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरीता पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून …

Read More »

कृषीमंत्री सत्तार म्हणाले, १ ते ५ जानेवारी दरम्यान सिल्लोडला कृषी महोत्सव महोत्सवात कृषी विद्यापीठे, विविध शासकीय विभागांसह विविध यंत्रणांचे ६०० स्टॉल्स

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतक-यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत १ जानेवारी ते ५ जानेवारी, २०२३ या कालावधीत सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव -२०२३ चे आयोजन केले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांनी केलेले …

Read More »

कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा

कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत मिळण्यासाठी भरीव पाठपुरावा करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्री सत्तार यांच्या दालनात आज कृषी विभागाच्या विविध योजनांची सद्यस्थिती आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी …

Read More »