Breaking News

मोर्चेकऱ्यांसाठी अशीही सेवा… सोलार पँनलच्या माध्यमातून मोबाईल चार्जींगची सुविधा

मुंबई : बी.निलेश

शेतकरी, आदीवासी आणि सर्वसामान्य व्यक्तींच्या न्याय मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई दरम्यान अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने शेतकरी लाँग मार्च काढला. मात्र या मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्तींचा मोबाईल फोन डिसार्च होवून त्यांचा कुटुंबियांशी संपर्क तुटू नये याउद्देशाने नथू निवृत्ती उदार या शेतकऱ्याने एक ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले. विशेष म्हणजे हा सोलार पँनल उदार याने दिवसरभर डोक्यावर ठेवून मोर्चात चालत होते. त्या पँनेलमधून निर्माण होणाऱ्या वीजेच्या माध्यमातून मोबाईल रिचार्ज करण्याची अनोखी सेवा उपलब्ध करून दिली.

मोर्चेकऱ्यांना मोबाइल चार्ज करण्यासाठी कोठेही वीज उपलब्ध नाही. त्यामुळे नथू यांनी हा उपाय केला. नाथू हे पॅनेल दिवसभर डोक्यावर अडकवून रात्री आपल्या सहकाऱ्यांचे मोबाइल, टॉर्च चार्ज करून देत असे. त्यामुळे सहा दिवसांच्या पायी प्रवासात

नाशिकपासून सुरू झालेल्या किसान लाँग मार्चमध्ये हजारो शेतकरी सामील झाले आहेत. यातले अनेक शेतकरी आपल्या कुटुंबियांना सोडून या मोर्चात सहभागी झाले. या शेतकऱ्यांना आपल्या घरच्यांशी संवाद साधण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे मोबाईल आणि नाथू यांनी हा उपाय करून आपल्या सहकाऱ्यांचा मोठा प्रश्न सोडवला.

नाथू हे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून आले असून ते पहिल्या दिवसापासून या शेतकरी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. नथू यांच्या या कल्पनेमुळे या लाँग मार्चमध्ये ४० ते ५० शेतकऱ्यांचे मोबाईल रोज चार्ज होत होते.

Check Also

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *