Breaking News

अखेर काँग्रेसच्या खासदारकीची माळ ज्येष्ठ पत्रकार केतकरांच्या गळ्यात शिंदे, शुक्ला, महाजनांच्या नावावर राहुल गांधी यांनी मारली काट

मुंबई : प्रतिनिधी

अखेर मुंबईतून राज्यसभेवर जावू इच्छिणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे आणि रत्नाकर महाजन यांच्या नावावर काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी फूली मारत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना मुंबईतून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा पत्रकारतेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे त्यांना यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला. याशिवाय कॉंग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी यांना पश्चिम बंगालमधून, तेलंगणामधून पोरीका बळीराम नाईक, मध्य प्रदेशमधून राजमनी पटेल, कर्नाटकातून डॉ.एल. हनुमतय्या, डॉ.सय्यद नासिर हुसेन, श्री. जी.सी.चंद्रशेखर या तिघांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. तर झारखंड येथून धीरज प्रसाद साहू आणि कर्नाटकातून नरनभाई रठवा, अमिन याजनिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर भाजपकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्यासह तिसऱ्या जागेसाठी व्ही.मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *