Breaking News

कोरोना: अबब…६० हजार; बाधित रूग्ण पोहोचले ५ लाखावर ५९ हजार ९०७ नवे बाधित, ३० हजार २९६ बरे झाले तर ३२२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

दोन-तीन दिवसाच्या अंतरानंतर राज्यात आज सर्वाधिक ५९ हजार ९०७ इतके बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी राज्यातील बाधितांच्या संख्येने ५७ हजार रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सर्वाधिक रूग्ण मुंबई महानगरातील ११ महानगरपालिका आणि पुणे शहर व ग्रामीण, नाशिक, नागपूर शहर व ग्रामीण मध्ये सर्वाधिक नोंदविण्यात आली आहे. मात्र मुंबईत मागील काही दिवसांपासून १० हजार रूग्ण आढळून येत असून त्याहून अधिकचे रूग्ण आढळून येत नसल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासात ३० हजार २९६ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २६ लाख १३ हजार ६२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.३६% एवढे झाले आहे. तर दिवसभरात राज्यात ५९ हजार ९०७  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधितांची संख्या ५ लाख १ हजार ५५९ वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ३२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ लाख ११ लाख ४८ हजार ७३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१ लाख ७३ हजार २६१ (१५.०० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ७८ हजार ५३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,२१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.  जिल्हानिहाय रूग्णांचा तक्ता खालीलप्रमाणे

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०४४२ ४८३०४२ २४ ११८५६
ठाणे १४३१ ५७४८८ १०२९
ठाणे मनपा १६७७ ९०३४३ १३५४
नवी मुंबई मनपा १५८२ ८०२३४ १२ १२२१
कल्याण डोंबवली मनपा १८१८ ९३६२१ ११४४
उल्हासनगर मनपा १६७ १५२७२ ३७५
भिवंडी निजामपूर मनपा १४८ ८५७१ ३६२
मीरा भाईंदर मनपा ५३३ ३५७२५ ६९६
पालघर ४१५ २१०७६ ३२७
१० वसईविरार मनपा ५२६ ३८२२४ २० ७३१
११ रायगड ५५९ ४४५५० १०३२
१२ पनवेल मनपा ६५४ ४२८५२ ६८१
ठाणे मंडळ एकूण १९९५२ १०१०९९८ ७१ २०८०८
१३ नाशिक १५३० ६५१४५ ९३२
१४ नाशिक मनपा २२९६ १३३४६५ ११ १२३७
१५ मालेगाव मनपा २७ ७३५३ १८४
१६ अहमदनगर ११८८ ६९४०८ ८०९
१७ अहमदनगर मनपा ४२० ३६५२० ४४५
१८ धुळे ५२२ १६०२५ २११
१९ धुळे मनपा ३२६ १३६७४ १७८
२० जळगाव १०९१ ६८९३९ १२४८
२१ जळगाव मनपा १०३ २४६२८ ३७७
२२ नंदूरबार ६७८ २२४८३ १९ ३३१
नाशिक मंडळ एकूण ८१८१ ४५७६४० ४७ ५९५२
२३ पुणे २४६२ १३८२०७ २२८०
२४ पुणे मनपा ५६३७ ३१४७४३ ४८०७
२५ पिंपरी चिंचवड मनपा २९२४ १५४०८२ १३९९
२६ सोलापूर ५८१ ५२९८५ १० १२९९
२७ सोलापूर मनपा २६५ १९८७० १० ६६८
२८ सातारा ९०३ ७००७१ १९०४
पुणे मंडळ एकूण १२७७२ ७४९९५८ ३२ १२३५७
२९ कोल्हापूर १२९ ३६३३१ १२७०
३० कोल्हापूर मनपा १०४ १६२०३ ४२९
३१ सांगली २७६ ३६८८१ ११८९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११४ २००४६ ६५७
३३ सिंधुदुर्ग ११६ ७८३० १९६
३४ रत्नागिरी ४५ १३५९१ ४२९
कोल्हापूर मंडळ एकूण ७८४ १३०८८२ ४१७०
३५ औरंगाबाद ६७२ २६६८७ ३६९
३६ औरंगाबाद मनपा १०९३ ६७१०५ १०७६
३७ जालना ९२१ २७३५१ २१ ४५८
३८ हिंगोली १८४ ८१२२ ११७
३९ परभणी २३० ८८४३ १९७
४० परभणी मनपा २९८ ८८७० १७६
औरंगाबाद मंडळ एकूण ३३९८ १४६९७८ ३५ २३९३
४१ लातूर ९३० २९०८० ५११
४२ लातूर मनपा २० ९५७५ २७१
४३ उस्मानाबाद २९३ २३७०४ ६११
४४ बीड ५९७ २९६३९ ११ ६६४
४५ नांदेड ८३८ २१०१६ १५ ४८९
४६ नांदेड मनपा ६२७ ३१०४५ २८ ४७४
लातूर मंडळ एकूण ३३०५ १४४०५९ ६२ ३०२०
४७ अकोला ५९ ११२४३ १६८
४८ अकोला मनपा १२२ १९४४९ ३१२
४९ अमरावती १९२ १८१७२ ३१३
५० अमरावती मनपा १५७ ३२६९४ ३५७
५१ यवतमाळ २८६ ३०३४१ ५७५
५२ बुलढाणा १५६३ ३४७३७ २९९
५३ वाशिम २९० १७९७३ १९७
अकोला मंडळ एकूण २६६९ १६४६०९ १३ २२२१
५४ नागपूर १९८३ ४५९७१ १० ९७५
५५ नागपूर मनपा ३७३८ २१३३७० ३१ ३१८२
५६ वर्धा ६८७ २४११३ ३९५
५७ भंडारा ११५९ २३७९१ ३२४
५८ गोंदिया ५५१ १८१४० १८५
५९ चंद्रपूर ३८४ २००१९ २७८
६० चंद्रपूर मनपा १८२ ११८७८ १७८
६१ गडचिरोली १६२ १०७०९ ११३
नागपूर एकूण ८८४६ ३६७९९१ ५३ ५६३०
इतर राज्ये /देश १४६ १०१
एकूण ५९९०७ ३१७३२६१ ३२२ ५६६५२

आज नोंद झालेल्या एकूण ३२२ मृत्यूंपैकी १२८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७५ मृत्यू, नागपूर-२१, पालघर-१५, सोलापूर-९,  जळगाव-७, जालना-४, पुणे-४, बुलढाणा-३, यवतमाळ-३, अकोला-२, नांदेड-२, ठाणे-२, गडचिरोली-१, गोंदिया-१ आणि रायगड-१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *