Breaking News

पहिल्यांदाच राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा विश्वास

मुंबईः प्रतिनिधी
मागच्यावेळी शिवसेना- भाजपा ४२ जागा जिंकली होती. परंतु यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस २२ जागांच्यावर विजय मिळवेलच पण पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्रात राष्ट्रवादी सर्वाधिक जागा जिंकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
सध्या येणारे एक्झिट पोल ठिक आहेत. ते आपापल्या परीने मांडले जात आहेत. परंतु यावेळी महाराष्ट्रात आम्ही जो पक्षाच्या स्थापनेनंतर विजय मिळाला नव्हता असा विजय आम्ही प्राप्त करणार असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
न्यायालयाने पहिल्यांदा व्हिव्हीपॅट स्लीप मोजायला सांगितले असून नंतर ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मशीनची मोजणी केली जावी. म्हणजे ज्या शंका होत्या त्या समजावून सांगितल्या आहेत. पाच ईव्हीएम मशीनची मोजणी करण्यात यावी असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. प्रश्न ईव्हीएमचा नाही, प्रश्न जिंकण्याचा किंवा पराभूत होण्याचा नाही तर देशात लोकशाहीच्या प्रती विश्वास निर्माण करण्याचा आहे. जर लोकांच्या मनात शंका निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, विश्वास निर्माण केला पाहिजे. परंतु निवडणूक आयोग ज्याप्रकारे व्यवहार करत आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील शंका अजुन वाढू लागली आहे. हे निवडणूक आयोगाला समजायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
देशात त्रिशंकू लोकसभा होणार आहे. यावर आमचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे एनडीएला बहुमत मिळणार नाही. राष्ट्रवादीने वारंवार सांगितले आहे, की आमची मर्यादित ताकद आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदाचा दावा करणार नाही. आणि पवारसाहेब यांनीही वारंवार स्पष्ट केले आहे की या पदाचे ते दावेदार नाहीत. परंतु ते पर्यायी सरकार बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *