Breaking News

जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी समिती स्थापन करणार

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

 मुंबई : प्रतिनिधी

 जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसारासह या कायद्याची परिणामकारक व योग्यरितीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार याबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे व इतर अधिकारी उपस्थित होते.

जादूटोणा विरोधी कायद्यामुळे समाजाची होणारी फसवणूक थांबणार आहे. त्याकरिता समाजप्रबोधन करुन राज्यातील सामान्य जनतेच्या मनातील गैरसमजुती दूर करणे गरजेचे आहे. संस्कारातून रुजलेल्या गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्चनिचता, गटपंथांमधील परस्पर द्वेष, स्त्री-पुरुष असमानता, दारिद्र्य अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी अजूनही समाजात अस्तित्वात आहेत. त्यात बदल होणे आवश्यक असून त्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार प्रसारासह त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणीसाठी समिती कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *