Breaking News
SONY DSC

देह व्यापारात बळी पडलेल्या महिलांना जीवन परिवर्तनासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणार वीर रणरागिणी महिला मेळाव्यात केंद्र निरिक्षक आय.एम.लोहार यांचे आश्वासन

देह व्यापारातील बळी महिलांना जीवनाची नवी उमेद मिळण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन जीवन परिवर्तन  करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कटिबट्ट असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा निरीक्षक आय.एम.लोहार  यांनी केले.

जागतिक एच. आय. व्ही./एड्स सप्ताहनिमित्त  स्नेहालय संचलित स्नेह्ज्योत प्रकल्प – १ च्या वतीने देह व्यापारातील बळी महिलांसाठी जिल्हास्तरीय  ‘वीर रणरागिणी’ महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.  याप्रसंगी ते बोलत  होते.  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी बाल कल्याण समितीचे सदस्य मा. प्रवीण मुत्याल होते तर व्यासपीठावर सुनील गिरी (जिल्हा निरीक्षक DACPU) विजय वाघमारे (आय सी टी सी समुपदेशक) दिनेश लोंढे (आय सी टी सी Lab technician) आदि उपस्थित होते.

लोहार म्हणाले की, देह व्यापारातील बळी महिलांना विविध  व्यावसायिक प्रशिक्षण आणि शासकीय व्यवसायाविषयीचे योजनाची  मदत मिळून देण्यास जिल्हा उद्योग केंद्र  स्नेहालय सोबत काम करेल.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रवीण मुत्याल म्हणाले की, देह व्यापारातील महिलांनी संघटित होऊन आपले प्रश्न समाजासमोर मांडले पाहिजे. देह व्यापार व्यतिरिक्त इतर पर्यायी व्यवसाय निवडणे महत्वाचे आहे. यावर्षी दुष्काळ असल्याने पाण्याची व पैशाची काटकसर करणे आवश्यक आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपली मानसिकता बदलावी.

देह – विक्रय करणाऱ्या महिलांमधून रंजना रणनवरे यांनी विविध शासकीय योजना, घरकुल योजना आणि शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी येणाऱ्या अडी अडचणी याबाबत माहिती दिली. तसेच  शासनाच्या विविध योजनांसाठी कागदपत्रांची मागणी केली जाते, ती कागदपत्रे महिलांकडे नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे महिलाच्या मदतीचे निकष बदलले जावेत, असे रंजना रणनवरे यांनी आग्रहाने सांगत महिलांच्या पुनर्वसनाची मागणी केली. सुनील गिरी यांनी एच. आय.व्ही. एड्स संदर्भात असणारे समज गैरसमज बाबत मार्गदर्शन केले. त्यांनी आरोग्य, आहार आणि उपचार याबाबत सखोल  माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेत दिपक बुरम यांनी स्नेहालय आणि स्नेह्ज्योत प्रकल्पाबाबत माहिती देवून देह विक्रय करणाऱ्या महिलांनी समाजासाठी कोणकोणते उपक्रम राबवले या बाबत सांगितले.  तसेच स्नेह्ज्योत प्रकल्पाच्या पुढाकारांनी २९  देह – विक्री करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विजय गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकल्प व्यवस्थापक सचिन बोरुडे यांनी मानले.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *