Breaking News

ऑस्ट्रेलिया सरकार तब्बल १६ हजार घोडे मारणार; काय आहे बातमीच सत्य हेलिकॉप्टरमधून गोळ्या झाडून १६ हजार घोड्यांचा करणार खात्मा

घोडा पाळीव प्राण्यांपैकी सर्वात वेगवान प्राणी समाजाला जातो. अगदी शर्यतीपासून ते लग्न समारंभांपर्यंत दिसणारा हा प्राणी फारच माणसाळलेल्या पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. मात्र याच प्राण्याविरोधात ऑस्ट्रेलिया सरकारने एक आदेश जारी केला आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने तब्बल 16 हजार घोड्यांना गोळ्या झाडून ठार करण्याचे आदेश जारी केले आहेत.

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स सरकारने हे आदेश जारी केले आहेत. कोसियुज्को राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळपास १९ हजार जंगली घोढे आहेत. या घोड्यांना ऑस्ट्रेलियामध्ये ‘ब्रुम्बीज’ असं म्हटलं आहे. २०२७ पर्यंत या घोड्यांची संख्या नियंत्रणात आणण्याचा सरकारचा मानस आहे. २०२७ पर्यंत आताच्या १९ हजारांवरुन ही संख्या केवळ ३ हजारांपर्यंत राहिली पाहिजे असं सरकारचं नियोजन आहे.

यासंदर्भातील माहिती न्यू साऊथ वेल्सच्या पार्यावर मंत्री पेनी शार्प यांनी दिली. या घोड्यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक सरकारने अनेक उपाययोजना केल्या असं पेनी शार्प यांनी सांगितलं. या घोड्यांना हळूहळू संपवलं जात आहे. यापैकी शेकडो घोड्यांना दुसऱ्या जागी स्थलांतरित केलं आहे. मात्र एवढं करुनही या घोड्यांशी संख्या नियंत्रणात राहत नाही.

सध्याचा नैसर्गिक समतोल या घोड्यांची संख्या वाढल्यास बिघडू शकतो. त्यामुळे यासंदर्भात मोठा निर्णय घेणं आवश्यक आहे असा युक्तीवाद पेनी शार्प यांनी केला. मागील २० वर्षांमध्ये या घोड्यांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. घोड्यांची संख्या भरमसाठ वाढल्याने येथील स्थानिक प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे अशी माहिती पेनी शार्प यांनी दिली आहे.

Check Also

१०५ लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्राथमिकता कोणत्या मुद्यांना लोकनीती प्री-पोल सर्व्हेत दिली कारणे

मागील महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर करण्यात आली. त्यावेळी देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघामध्ये सात टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *