Breaking News

उशी न वापरण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का ? वाचा डोक्याखाली उशी न घेता झोपण्याचे फायदे तुम्हाला करतील हैराण

डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय काही लोकांना झोपच येत नाही. तर काही लोक हलकी आणि सॉफ्ट म्हणजे जास्त जाड नसलेली उशी वापरतात. पण उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चांगली नाही. उलट उशी डोक्याखाली न घेता झोपण्याचे अनेक फायदेही आहेत.

जाणून घ्या उशी न वापरण्याचे फायदे…

त्वचेसंबंधी फायदा

उशीचा सतत वापर केल्याने त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. कारण उशीमुळे चेहऱ्यावर दबाव पडतो. जे लोक उशीचा वापर करत नाहीत, त्यांना ही समस्या होत नाही. उशी न वापरल्याने पिंपल्स येण्याची समस्याही कमी होते. कारण उशीचे कव्हर नेहमी धुतले जात नाहीत, त्यामुळे त्यातील धुळ-कण यांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

पाठीच्या कण्याला आराम

जर तुमचा पाठीचा कणा फार आधीपासून दुखत असेल तर काही दिवस उशी न घेता झोपून बघा. तज्ज्ञ सांगतात की, उशीचा वापर केल्याने आपली मान आणि पाठीच्या कण्याचा तणाव वाढतो. त्यामुळे अनेकदा मानेचा त्रास व्हायला लागतो. त्यामुळे उशी न वापरणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.

मानेचं दुखणं होईल कमी

जेव्हा आपण उशीचा वापर करतो तेव्हा आपल्या पाठीच्या कण्याची स्थिती बदलते. अशात सतत पाठीदुखीची समस्या होऊ लागते. तसेच उशी न वापरता झोपल्याने मान योग्य दिशेने राहते आणि यामुळे पाठदुखीची समस्या होण्याचाही धोका राहत नाही.

चांगली झोप लागते

उशी डोक्याखाली घेऊन झोपल्याने अनेकदा काही लोकांना थकवा जावणतो. याचा अर्थ तुमची चांगली आणि पुरेशी झोप होत नाहीये. जेव्हा एखादी व्यक्ती उशीचा वापर न करता झोपली तर त्याची चांगली झोप होऊ शकते. तसेच इतरही काही समस्या दूर होतात. झोप पूर्ण झाल्यवर तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटतं.

Check Also

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *