Breaking News

मराठा आंदोलनात घडलयं ते दुर्दैवी; त्याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मागणी

मराठा आंदोलनाच्या वेळी जालना येथे जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवी आहे, याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी असं भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे या शिव-शक्ती परिक्रमेला सुरवात करण्यापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना बोलत होत्या. मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशीलपणे हाताळला जावा.

तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, त्यात अशी अप्रिय घटना घडायला नको होती. यापूर्वी मी मंत्री असताना परळीत आंदोलन झालं होतं, पण ते शांततेत झालं होतं. आम्ही जसं सभागृहात एखादा लोकप्रतिनिधी सांगतो की असं असं झालंय ते खरयं असं गृहीत धरून त्याबद्दल चौकशी करण्याचा एक नियम आहे, तसंच एखादा नागरिक सांगतोय त्यातला त्यात एखादा आंदोलकर्ता सांगतोय की ते घडलं नाही, किंवा त्यात आम्ही सहभागी नाहीत तर ते खरं समजून त्या विषयाची योग्य पध्दतीने आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. शेवटी सरकार हे मायबाप असतं ,यात कोण दोषी आहे ते बाहेर येईलच पण तुर्तास ज्यांच्यावर लाठीमार झाला, जे जखमी झाले त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करते.

त्याचबरोबर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याव असं काही जण म्हणत आहेत, यामुळे तणाव निर्माण होईल का? असा प्रश्न एका पत्रकारानं विचारला असता त्यावर उत्तरादाखल त्या म्हणाल्या, या मागणीबद्दल माझं मत वर्षानुवर्षे तेच आहे. पहिले तर मराठा समाजाच्या या मागणीला योग्य प्रतिसाद आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे तथापी यावरून कोणी ओबीसी व मराठा समाजात भांडण लावण्याचा प्लॅन आखत असेल तर दोघेही मिळून ते पूर्णपणे अयशस्वी करतील असं विश्वासही व्यक्त केला.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *