Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचे टीकास्त्र, आम्ही असा काही करंट दिला की…. शासन आपल्या दारी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका

परभणी जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, देश चंद्रावर जात आहे. मात्र काहीजण घरात बसून राज्य चालवित होते असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावत पुढे म्हणाले, आम्ही असा काही करंट दिला की घरात बसणारे डायरेक्ट लाईनवर आले अशी खोचक टीकाही केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. राज्यात होत असलेली विकासकामे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही सरकारसोबत आले. अजित पवार सोबत आल्याने आता हे सरकार ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे.
विरोधकांनी त्यांच्यावर किंवा आमच्यावर टीका करण्याशिवाय एकही विधायक सूचना आजवर केलेली नाही. त्याना ऑनलाइन वरून लाईनवर आणण्याचे काम आम्ही केले आहे. यांचा भोंगा कायम वाईट बोलण्यासाठी वाजतो तो कधीही काही चांगले सांगत नाही. राज्यात होत असलेले शासन आपल्या दारीचे कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडत असल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते फक्त टीका करत सुटले आहेत असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. सरकार जाण्याची भाकिते करून दमलेल्या विरोधकांनी आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू केल्या आहेत असे मत यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नुकताच त्यांनी चंद्रयान-३ मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांना ज्यापद्धतीने प्रोत्साहित केले ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सहाय्यानेच मराठवाडा वॉटर ग्रीड किंवा पश्चिम घाटाचे पाणी मराठवाड्यात वळवणे असे प्रकल्प पूर्ण करता येणे शक्य होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

सर्वसामान्य नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात खेटे मारायला लागू नयेत यासाठी शासन आपल्या दारी हा अत्यंत लोकाभिमुख कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला असून त्यामाध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भारतीय रेल्वेचे ७० टक्के खासगीकरण

भारतीय जनता पक्षाला माझे आव्हान आहे की, मी जी माहिती देत आहे ती खोटी आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *