Breaking News

ठाकरेंच्या फडणवीसांवरील टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर, सुट्टी एन्जॉय… उद्धव ठाकरे यांना सडकछाप शब्दांचा वापर करावा लागतोय

नुकतेच जपान दौऱ्यावरून परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठी गुंतवणूक येणार असल्याची घोषणा केली. त्यावर हिंगोली येथील निर्धार सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दौऱ्यावरून टीका केली. या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस तुमच्यासारखं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जपानला गेले नव्हते असे प्रत्युत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिले. तसेच पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विवेकभ्रष्ट, नितीभ्रष्ट झाल्यानं उद्धव ठाकरेंना सडकछाप शब्दांचा वापर करावा लागतोय अशी टीकाही केली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जे उद्धव ठाकरे सत्तेत असताना अडीच वर्षे घरात बसून होते, ज्यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं, गेल्या महिन्यात जे १५ दिवस परदेश दौऱ्यावर जाऊन सुट्टी एन्जॉय करून आले ते देवेंद्रजी यांच्या जपान दौऱ्यावर टीका करत आहेत. देवेंद्रजींचा जपान दौरा तुमच्यासारखा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी नव्हता तर राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी होता असेही स्पष्ट केले.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव जी एक लक्षात घ्या, तुम्ही आता विवेकभ्रष्ट, नितीभ्रष्ट झाला आहात. म्हणूनच देवेंद्रजी यांच्यावर टीका करताना तुम्हाला सडकछाप शब्दांचा वापर करावा लागत आहे. तुमचे हे नैतिक अधःपतन महाराष्ट्र बघत आहे असा इशारा दिला.

आदरणीय मोदीजींच्या कर्तृत्वामुळे तुमच्या घमेंडियाला घरघर लागली आहे. त्यामुळे तुम्ही हर घर मोदी अभियानावर टीका करत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. मोदीजी आणि देवेंद्रजींवर असलेल्या जनतेच्या प्रेमामुळेच तुमच्या अहंकाराचा येत्या निवडणुकीत पराभव होईल असा इशाराही दिला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला या दोन मुद्यांची भर घालत दिला मसुदा

सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आराक्षणासंदर्भात आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *