Breaking News

भाजपाचा नवा आरोप: पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांचा हात अतुल भातखळकरांच्या आरोपापाठोपाठ भाजपा प्रदेशाध्यक्षांचीही मागणी

मुंबईतील बहुचर्चित पत्रावाला चाळप्रकरणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेत त्यांच्या चौकशी करण्याची मागणी केली. भातखळकर यांच्या मागणी पाठोपाठ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवानकुळे यांनीही अतुल भातखळकर हे अभ्यासू आमदार असल्याचे सांगत या मागणीला पाठींबा दिला.

पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांची चौकशी करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली. या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपाची भूमिका काय आहे? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बावनकुळे यांना विचारला. यावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अतुल भातखळकर हे अत्यंत हे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांनी माननीय शरद पवार यांचा हस्तक्षेप आहे असं त्यांनी पत्र लिहून म्हटलं आहे. तर त्यांच्याकडे काही बाबी किंवा पुरावे असतील म्हणूनच त्यांनी गृहमंत्र्यांकडे ही विनंती केली आहे. तर गृहमंत्री आणि सरकार त्याची चौकशी करतील असं मला वाटतं, असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केले.

ईडीच्या चार्टशीटमध्ये म्हटलं आहे शरद पवार हे जेव्हा केंद्रीय कृषीमंत्री होते तेव्हा वाय बी सेंटरला म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्राचाळसंदर्भात बैठका झाल्या. त्यानंतर वाधवानला प्रकल्प देण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. अर्थात नाव नाहीय पवारांचं चार्टशीटमध्ये असं म्हणत बावनकुळेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर बावनकुळे यांनी, हे संपूर्ण केंद्रीय आणि राज्याच्या तपास यंत्रणांचं प्रकरण आहे. याबद्दल जी काही चौकशी होईल ती समोर येईल असेही ते म्हणाले.

अतुल भातखळकरांनी गृहमंत्र्यांना पत्र दिलं असेल तर गृहमंत्री चौकशी करतील. त्या बैठकीत काय झालं याची चौकशी होईल. यामध्ये जी चौकशी होईल. त्यामधून जे समोर येईल ते महाराष्ट्राला कळेलच असेही ते म्हणाले.

Check Also

पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *