Breaking News

संजय राऊत म्हणाले, भाजपा आणि मनसेमुळे हिंदू धर्मियांचा आज काळा दिवस भोंग्यामुळे काकड आरत्या बंद झाल्याने

भाजपाने मनसेला पुढे करून भोंग्याचा विषय आणून गोंधळा घालण्याचा प्रयत्न केला. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार राज्यातील तीर्थस्ताने आणि श्रध्दास्थांनावर सकाळच्या काकड आरत्या होतात. या आरत्यांना लोकांना प्रवेश दिला जातो. मात्र भोंग्याचा विषय निर्माण झआल्यामुळे या संपूर्ण देवस्थांनावर लाऊड स्पीकर लागले नाहीत त्यामुळे पंचक्रोशीतील लोकांनाही आनंद मिळतो. परंतु आज लाऊडस्पीकर न लागल्याने काकड आरत्यांचा आनंद घेतला नसल्याचे सांगत हा हिंदू धर्मियांसाठी काळा दिवस असल्याची टीका शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खांद्यावर बंदुका ठेवून भाजपाने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला. तसेच, हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचेही ते म्हणाले. बुधवारी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील टीका केली.
मशिदींवरील भोंग्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भोंग्याच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी भाजपा आणि मनसेवर निशाणा साधला.
भोंग्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सन २००५ चा आहे. भाजपाने मनसे सारख्या पक्षाला पुढे करून हा विषय चर्चेत आणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण, जो गुप्तचर खात्याचा किंवा इतर विभागाचा अहवाल आला आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थाने, श्रद्धास्थाने आहेत त्यामध्ये शिर्डी, त्र्यंबकेश्वर यासह अनेक देवस्थानावर सकाळच्या काकड आरत्या होतात. काकड आरतीला मंदिरात खूप कमी लोकांना प्रवेश असतो. या काकड आरतीचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील लोक जागे असतात किंवा आसपास उभे असतात. मात्र, आज भोंग्यांचा विषय निर्माण झाल्यामुळे या संपूर्ण देवस्थानावर लाउडस्पीकर लागले नाहीत आणि लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाली. त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही. म्हणजे मशिदींवरील भोंग्यांचे निमित्त करून भाजपाने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदूंचाही गळा घोटला, अशी टीका त्यांनी केली.
आज सकाळपासून आमच्याकडे हजारो लोकांनी मेल, फोन आणि पत्राद्वारे तक्रारी केल्या आहेत. शिर्डीत आज हजारो भाविक होते. त्यांनी काकड आरतीबाबत विश्वस्तांकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वरला सकाळच्या आरतीसाठी हजारो लोक बाहेर येतात. अनेक गावातील लोक या आरतीचा लाउडस्पीकरच्या माध्यमातून आनंद घेतात. परंतु, तो आज घेता आला नाही. हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचेही ते म्हणाले.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *