Breaking News

मलिकांच्या ट्विटला रेडकरांचे ट्विटने उत्तर तर समीर वानखेडे म्हणतात… नवाब मलिकांच्या ट्विटवर समीर वानखेडेंचे उत्तर

मुंबई: प्रतिनिधी

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात दररोज पुराव्यासह पोलखोल करणारे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी आज एक ट्विट करीत एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांना पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांची बहिण हर्षदा दिनानाथ रेडकर यांच्यावर पुण्यात ड्रग्जची केसच्या तारखेचा फोटो ट्विट करत समीर वानखेडे यांना या प्रकरणी उत्तर द्यावे, असे आवाहन केले.

त्यावर क्रांती रेडकर यांनी त्यास ट्विटरच्याच माध्यमातून उत्तर देत म्हणाल्या की, नवाब मलिक यांच्या ट्विटवरून बहिण हर्षदा रेडकर यांच्या केसबाबतची विचारणा केली आहे. मात्र त्या सध्या ती केस न्यायालयात असल्याने त्याबाबत जाहिरपणे बोलणे योग्य होणार नाही. मात्र त्यास कायदेशीर उत्तर देणार आहे.

तर समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी तर त्यावेळी नोकरीलाही नव्हतो. त्यामुळे त्या प्रकरणाशी काहीही संबध नाही. माझे लग्न क्रांती रेडकरशी २०१८ साली झाले. तर ही केस २००८ सालची आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक काल पत्रकार परिषद घेवून क्रूझ ड्रग्ज प्रकरणी पुराव्यासह अनेक खळबळजनक दावे केले. त्यानंतर आज मलिक यांनी ट्विट करीत क्रांती रेडकर यांची बहिण आणि समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर यांच्यासंदर्भात ट्विट करीत समीर वानखेडे यांना प्रश्न विचारले. क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचे प्रकरण प्रलंबित आहे. मलिक यांनी आज केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय ? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, कारण तिच्या विरोधातील केस पुणे न्यायालयात प्रलंबित आहे.

 

 

 

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका भटकती आत्मा…शरद पवार म्हणाले, ते खरंय

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच, बारामती आणि शिरूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *