Breaking News

एनसीबी आणि समीर वानखेडे हे एकंदरीत प्रकरण गंभीर ; योग्य ती पावले टाकणार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे संकेत

ठाणेः प्रतिनिधी
प्रभाकर सैल याने समीर वानखेडे यांच्या विरोधात खळबळजनक आरोप केल्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत एनसीबी आणि समीर वानखेडे यांचे प्रकरण समोर आणले असून एकंदरीत हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगत समीर वानखेडे याच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला मग शेवटी सरकार पडत नाही म्हटल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्यातलाच हा आर्यन खान प्रकरण असल्याचे ते म्हणाले.
आर्यन खान प्रकरण बोगस प्रकरण असल्याचे नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत उघड केले आहे. आज समीर वानखेडे यांचे जन्म दाखला प्रसारीत केला आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत असल्याचेही ते म्हणाले.
प्रभाकर सैल याने एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे हे सर्व धक्कादायक आहे. मुंबईतील बॉलिवूड आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी सक्रिय झालेली दिसते असा आरोपही त्यांनी यावेळा केला.
सुरुवातीला आर्यन खानमुळे ड्रग्ज प्रकरण हे केवळ बॉलीवूड पुरते असल्याचे दिसून येत होते. मात्र आता कारवाईत खंडणीचा मुद्दा उपस्थित झाल्याने आणि वानखेडे यांनी केलेल्या सर्वच कारवाई मागे भाजपा असल्याचा अप्रत्यक्ष हात असल्याचे दिसून स्पष्ट होत असल्याने भाजपा विरूध्द महाविकास आघाडी सरकार असे चित्र निर्माण झाले. आता तर एनसीबी विरूध्द महाविकास आघाडी सरकार असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *