Breaking News

Missionbeginagain अंतर्गत १५ ऑक्टोंबरपासून या गोष्टी सुरु होणार राज्य सरकारकडून अद्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात Missionbeginagain अंतर्गत अनेक गोष्टी पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात येण्यात येणार होती. तसेच १५ ऑक्टोंबरपासून मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची चर्चाही मागील काही दिवसांपासून सुरु होती. मात्र या लोकल रेल्वे वगळता घाटकोपर ते अंधेरी-वर्सेाव्हा दरम्यान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. ही सेवा उद्या १५ पासून सुरु होणार आहे. तसेच वाचनावेड्या असलेल्या जनतेसाठी पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी खाजगी आणि सरकारी ग्रंथालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

१५ ऑक्टोंबर अर्थात उद्यापासून सुरु होणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला परवानगी मात्र अपवाद केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीचा.

मेट्रो सेवा सुरु करण्यास परवानगी.

राज्यातील केंद्राच्या कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या कौशल्य विकासच्या प्रशिक्षण संस्था, आयटीआय, आयआयई च्या प्रशिक्षण संस्था उद्यापासून सुरु होणार.

शाळांमधून ऑनलाईन शिकविण्याकरिता आणि इतर कामासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५० टक्केच्या प्रमाणात हजर राहण्यास परवानगी.

पीएचडी असलेल्या आणि सायन्स व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यास सर्व सरकारी आणि खाजगी विद्यापीठानांना परवानगी.

तसेच पदवुत्तुर असलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अभ्यासाच्या अनुषशगाने प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय केंद्राच्या निधीवर चालणाऱ्या विद्यापीठांनी स्वत: घ्यायचा आहे.

लग्न व इतर कार्यक्रमासाठी ५० जणांच्या उपस्थितीत तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांची अट कायम ठेवण्यात आली आहे.

बिझनेस टू बिझनेस कारणासाठी प्रदर्शन आयोजित करता येणार.

शहरी व ग्रामीण भागातील आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी.

विमानतळावर प्रवासातून येणाऱ्या प्रवाशांनी स्वत:ची चाचणी करणे बंधनकारक.

आदी गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय राज्यातील शाळा, कॉलेज, कोचिंग संस्था आदी गोष्टी ३१ ऑक्टोंबर पर्यत बंदच राहणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *