Breaking News

१२ वीच्या निकालात गतवर्षीपेक्षा यंदा ४.७ टक्क्याने वाढ सर्वाधिक निकाल कोकण तर सर्वात कमी औरंगाबादचा निकाल

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील १२ वी परिक्षार्थींचा निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा निकाल ९०.६६ टक्के इतका लागला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी १२ वी निकालात ४.७ टक्केने वाढ झाली आहे. या निकालात कोकणने बाजी मारली असून राज्यात सर्वात कमी निकाल औरंगाबादचा लागला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे दिली. तसेच निकाला दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी निकाल जाहिर केला. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोणक विभागाचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.
www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच निकालाबद्दलची इतर आकडेवारी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.
यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी अधिक आहे. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.४० टक्के इतका लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याने यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. ९३.११ टक्केवारीसह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. सातारा जिल्हा ९२.१८ टक्केवारी दुसर्‍या स्थानी आहे. सांगली जिल्ह्यातील ९१.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनरप्रविष्ट विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३४.७१ इतके आहे.
निकाल कोणत्या वेबसाईटवर पाहता येणार ?

> www.mahresult.nic.in

> www.hscresult.mkcl.org

> www.maharashtraeducation.com

Check Also

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *