Breaking News

केंद्रांच्या निर्णयानंतर ठाकरे सरकार चीनी कंपन्यांबाबत निर्णय घेणार, सध्या जैसे थे उद्योचग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
लडाख येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या चीन सैनिकांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात चीनच्या विरोधात भावना निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुंतवणूकीच्यादृष्टीने चीनी कंपन्यांसोबतच्या सांमज्यस कराराला जैसे थे ठेवण्याचे धोरण स्विकारले असून यासंदर्भात केंद्र अर्थात मोदी सरकारने धोरण स्पष्ट केल्यानंतरच गुंतवणूकीला मान्यता द्यायची कि रद्द करायचे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने १५ जून, २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण ५ हजार ०२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

आरबीआयच्या पतधोरणात वातावरणीय घटनांचा उल्लेख

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) च्या ताज्या चलनविषयक धोरण अहवालाचे (त्याच्या एप्रिल बुलेटिनमध्ये समावेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *