Breaking News

Tag Archives: vijay wadettiwar

ब्रम्हपूरीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम राज्यभरातील ६०० महिला कुस्ती पटुंचा सहभाग; लाखोंची बक्षीसे

ब्रम्हपूरी शहराला शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन विधानसभा …

Read More »

… चर्चेची मागणी फेटाळल्याने काँग्रेससह विरोधकांचा सभात्याग

राज्यातील दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शेतकऱ्यात नैराश्य आहे. अजून पंचनामे झाले नाहीत. अधिकारी सरकारचे का ऐकत नाहीत, असा सवाल करत विधानसभेतील काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात अवकाळीने पीक गमावले.आता नाशिक परिसरात कांदा उत्पादक …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, सरकारच्या चहापानाला जाणे, हा संकटातील शेतकऱ्याप्रती द्रोह

राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होत. हा कार्यक्रम टाळला असता तर शासन शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्देवाने …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, शेतकऱ्यांना वीस वर्षाचा पगार आणि एकरी २५ लाख रुपये द्या

शेतकऱ्यांची जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादित करून डागा कोलमाईन्सला दिली. त्यानंतर डागा कंपनीने ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर अरविंदो कंपनीला दिली. या कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. रोजगार दिला नाही. त्यामुळे २० वर्ष पगार मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा, यासाठी सरकारने हा …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, …दलित युवकाच्या हत्येची एसआयटीमार्फत चौकशी करा यालाच रामराज्य म्हणायचे काय?

नागपूर येथील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. ‘तुम्ही महार आणि मुस्लीम असूनही येथे कशाला आले?’ अस म्हणून केवळ गडमंदिर शोभायात्रेत सामिल झाला म्हणून मारहाण केल्याचे पीडिताच्या वडिलांनी पोलीस जबाबात सांगितले आहे. ही घटना …

Read More »

दूधाला दर द्या, डॉ अजित नवले यांचे उपोषण सुरूः बाळासाहेब थोरात म्हणाले, दर…

दुधाला ३४ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या संदीप दराडे, कॉम्रेड डॉ अजित नवले आणि सहकाऱ्यांची आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली, उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची ही त्यांनी विनंती केली. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, दुधाचा विषय हा गरीब माणसाच्या अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा आहे. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, महायुती सरकारमध्ये नेमकं काय चाललंय?

जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी वाढता पाठिंबा पाहून पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी अंतरवाली सराटी येथील वयोवृद्ध नागरिक, महिलांसह निर्दोष आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. या प्रकरणावरून राजकिय वादंग पेटलेले असताना मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांची बदली करण्यात …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, सरकारचे परीक्षार्थींना सबुरीचे गाजर

राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडल्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून इतर आश्वासनाप्रमाणे हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले “सबुरी” चे गाजरच असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ निवारणासाठी.. .सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा वाढीव दुष्काळी महसूल मंडळांना सरकारने आर्थिक मदत करावी

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि वेळ सरकारने पाळली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही. सरकार सत्ता टिकवण्यात गुंग असल्याने प्रशासनावर वचक नाही. या सरकारच्या गोंधळामुळे आता दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच आली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेल्या गलथानपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा निर्धार, जीवात जीव असेपर्यंत आरक्षणासाठी लढणार

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार,असा विश्वास देत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय …

Read More »