Breaking News

विजय वडेट्टीवार यांची मागणी, शेतकऱ्यांना वीस वर्षाचा पगार आणि एकरी २५ लाख रुपये द्या

शेतकऱ्यांची जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादित करून डागा कोलमाईन्सला दिली. त्यानंतर डागा कंपनीने ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर अरविंदो कंपनीला दिली. या कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. रोजगार दिला नाही. त्यामुळे २० वर्ष पगार मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळावा, यासाठी सरकारने हा प्रश्न तातडीने सोडवावा, एकरी २५ लाख रुपयांचा मोबदला द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, डागा कंपनीने बेलोरा जेना गावातील ३३० एकर जमीन गावकऱ्यांना नोकरीचे आमिष दाखविले. कवडीमोल भावाने ही जमीन भूसंपादित करण्यात आली. त्या जागेवर पॉवर प्लॅन्ट उभारून त्यासाठीचा कोळसा शेत जमिनीतून उत्खनन करायचा त्यांचा उद्देश होता. गावात रोजगार येणार म्हणून गावकऱ्यांनी ही जमीन दिली. परंतु गावकऱ्यांची फसवणूक झाली. डागा कंपनीने बेकायदेशीर ही जमीन अरविंदो कंपनीला दिली. या दोन्ही कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. शेतकऱ्यांची २० वर्षांपासून फसवणूक सुरु आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, शेतकऱ्यांना २० वर्षाचा पगार मिळावा तसेच आजच्या दराने जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, रोजगार मिळावा, गावाजवळून नाला वळविल्याने नाल्याचे पाणी गावात जाण्याची भीती गावकऱ्याना आहे. या नाल्याचा प्रश्न सोडवावा, अशी बेलोरा जेना येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. ही मागणी रास्त असून सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, एकरी २५ लाख रुपये मोबदला द्यावा, असे स्पष्ट करत बेलोरा जेना येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *